Who will lead Team India in the absence of Suryakumar Yadav T20 Series : टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दुखापतग्रस्त झाला आहे. बुची बाबू स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान सूर्याच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. मुंबईकडून खेळणारा सूर्या तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन इलेव्हनविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात जखमी झाला. या सामन्यात सूर्या केवळ ३८ चेंडूतच मैदानावर राहू शकला आणि यानंतर त्याच्या दुलीप ट्रॉफी खेळण्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे, ज्यामध्ये सूर्या ‘क’ संघाचा भाग आहे. सूर्याची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल कोणतीही माहिती नाही, परंतु पुढील महिन्यात भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी तो उपलब्ध नसेल, तर कोणत्या खेळाडूकडे संघाची धुरा सोपवली जाऊ शकते जाणून घेऊया.
१. ऋषभ पंतला
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. जर सूर्या बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपर्यंत तंदुरुस्त नसेल, तर पंतकडे धुरा सोपवली जाऊ शकते. पंतला कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व केले आणि २०२२ मध्ये पाच वेळा भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व केले असून २ सामने जिंकले आणि २ गमावले, तर एक सामना अनिर्णित राहिला.
हेही वाचा – Rohit Sharma : ‘रोहितविरुद्ध अंपायरिंग करणे खूपच सोपे, कारण तो…’, अंपायर अनिल चौधरी हिटमॅनबद्दल काय म्हणाले?
२.हार्दिक पंड्या –
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करण्याची आणखी एक संधी मिळू शकते. टी-२० विश्वचषक २०२४ नंतर पंड्याची कर्णधारपदी नियुक्ती होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती, मात्र निवडकर्त्यांनी सर्वांनाच चकित करत सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवले. आता सूर्यकुमार जखमी झाल्यानंतर पंड्याला संघाचे नेतृत्व करण्याची आणखी एक संधी मिळू शकते. पांड्याने यापूर्वी भारतीय संघाचे नेतृत्व करताना १६ सामने खेळले आहेत, त्यापैकी १० सामने त्याने जिंकले आहेत आणि ५ सामने गमावले आहेत.
३. शुबमन गिल
शुबमन गिल हा देखील भारताचा टी-२० संघाचा कर्णधार होण्यासाठी प्रबळ उमेदवार आहे. अलीकडेच त्याने श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून काम पाहिले होते. गिलने झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघाचे नेतृत्व केले होते. शुबमनच्या नेतृत्वाखाली भारताने झिम्बाब्वेविरुद्धची टी-२० मालिका ४-१ ने जिंकली. अशा परिस्थितीत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी सूर्या फिट नसल्यास त्याच्याकडे संघाची धुरा सोपवली जाऊ शकते.