ND vs PAK Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासाठी भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने मोलाची कामगिरी केली. त्याने गोलंजादी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागांत चांगला खेळ करून भारताला विजय मिळवून दिला. दरम्यान, सामन्यानंतर त्याने प्रतिक्रिया दिली. ”शेवटच्या षटकात १० खेळाडू जरी सीमा रेषेवर ठेवले असते, तरी मला काही फरक पडला नसता, मला मोठा फटका मारायचाच होता”, असे तो म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – विराट कोहलीच्या फॉर्मबाबत वसीम जाफरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “ती ३५ धावांची खेळी…”;

नेमकं काय म्हणाले हार्दिक पंड्या?

शेवटच्या षटकात सात धावांची आवश्यता होती. या धावा काढणं खूप मोठं आव्हान नव्हतं, यावेळी १० खेळाडू जरी सीमा रेषेवर ठेवले असते, तरी मला काही फरक पडला नसता, मला एक मोठा फटका मारायचा होता. माझ्यावर दबाव नव्हता. मात्र, गोलंदाजावर आहे, हे मला माहिती होतं, त्यामुळे तो चेंडू कसा टाकणार, याची मल कल्पना होती आणि मी त्याचा फायदा घेतला, अशी प्रतिक्रिया हार्दिक पंड्याने सामन्या संपल्यानंतर दिली.

हेही वाचा – हार्दिक पंड्याच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर स्मृती इराणी यांची भन्नाट प्रतिक्रिया, वाचा…

पुढे तो म्हणाला, ”मला तो दिवस आजही आठवतो, जेव्हा मला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं. २०१८ च्या आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध खेळताना याच मैदानावर ती घटना घडली होती. भूतकाळात घडलेल्या अशा घटनांतून पुढे जाताना तुम्हाला काहीतरी केल्याचं समाधान मिळते. आज मला ती संधी मिळाली होती, असेही तो म्हणाला.