मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासारख्या खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यास कसोटी क्रिकेट संपेल, असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा याने व्यक्त केले. 
तो म्हणाला, सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये खेळतच राहावे, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. त्याने एकदिवसीय सामन्यातून निवृत्ती घेतल्याचे ऐकून मला बरे वाटले. माझ्या मते, कसोटी हे शिक्षण असून, एकदिवसीय व ट्वेंटी-२० सामने केवळ मनोरंजन आहे. सचिनमध्ये अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे. तो अजून तीन ते चार वर्षे व्यवस्थित खेळू शकेल. ३९ वर्षांचा हा मुंबईकर भारतातील इतर युवकांपेक्षा जास्त तरुण आहे. 
१९९६ मध्ये झालेली विश्वकरंडक स्पर्धा श्रीलंकेने अर्जुन रणतुंगा यांच्या नेतृत्त्वाखाली जिंकली होती. रणतुंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा