MS Dhoni opens up about not being very active on social media : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांना वर्षभर वाट पाहावी लागते. कारण सध्या तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. त्याचबरोबर तो सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. सोशल मीडियापासून दूर राहून माही ‘लाइफ एन्जॉय’ करत असतो. मात्र, चाहत्यांना माहीबद्दलची अपडेट्स पत्नी साक्षीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. धोनीने आता सोशल मीडियावर सक्रिय नसण्याचे कारण सांगितले आहे. त्याला अनेक वेळा सोशल मीडियासाठी सल्ला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय माही त्याच्या फिटनेसबद्दलही बोलला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धोनीचा सोशल मीडियाबाबत खुलासा –

‘युरोग्रिप टायर्स’च्या ‘ट्रेड टॉक्स’च्या ताज्या एपिसोडमध्ये धोनी म्हणाला, ‘मी सोशल मीडियाचा कधीच मोठा चाहता नव्हतो. माझ्यासोबत अनेक व्यवस्थापक काम करत होते आणि ते मला सोशल मीडिया वापरण्याचा सल्ला देत होते. मी २००४ मध्ये खेळायला सुरुवात केली, तेव्हा सोशल मीडिया लोकप्रिय होत होता. त्यामुळे व्यवस्थापक वेगवेगळे तर्क देत होते की तुम्ही काही पीआर बनवा, पण माझे एकच उत्तर होते की मी चांगले क्रिकेट खेळलो तर मला पीआर करण्याची गरज नाही.’

एमएस धोनी पुढे म्हणाला, ‘माझ्याकडे सोशल मीडियावर काही शेअर करण्यासारखे असेल तर मी ते नक्की शेअर करतो. कोणाचे किती फॉलोअर्स आहेत, कोण काय करत आहे यावर गोष्टींकडे लक्ष देत बसत नाही. कारण मला माहित आहे की, जर मी चांगले क्रिकेटच खेळत राहिलो, तर बाकी सर्व काही स्वतःच होईल.’

हेही वाचा – Border Gavaskar Trophy : गौतम गंभीर व निवड समितीमध्ये ‘या’ खेळाडूवरून मतभेद; पहिल्या कसोटीत कोच सरांना मनासारखा संघ मिळाला नाही?

u

फिटनेसबाबत माही काय म्हणाला?

फिटनेसबद्दल बोलताना माही म्हणाला, ‘मी पूर्वीसारखा तंदुरुस्त नाही, आता तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही काय खाता? यावर तुमचे खूप नियंत्रण असणे आवश्यक आहे. क्रिकेटसाठी फिट राहण्यासाठी मी खूप खास काम करत आहे. मी वेगवान गोलंदाज नाही. त्यामुळे माझ्या गरजा इतक्या जास्त नाहीत. खाणे आणि व्यायामशाळेत जाणे दरम्यान बरेच खेळ खेळणे ही मला खरोखर मदत करते. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मला टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल असे विविध खेळ खेळायला आवडतात. हे खेळ मला व्यस्त ठेवतात. फिटनेस राखण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे.’

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you play good cricket you dont need pr ms dhoni on social media driven era video viral vbm