सरफराज खानकडे वारंवार दुर्लक्ष केल्याबद्दल महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयच्या निवडकर्त्यांवर टीका केली आहे. सरफराज गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली धावा करत आहे, पण त्याला कसोटी संघात स्थान मिळू शकलेले नाही. मुंबईकराने २०२० पासून एक तिहेरी आणि दोन द्विशतकांसह १२ शतके झळकावली आहेत. परंतु निवडकर्त्यांनी त्याला एकदाही संघात निवडले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्गज क्रिकेटर २५ वर्षीय सरफराजच्या समर्थनात उतरले आहेत. गावसकर निवड समितीच्या धोरणावर टीका करताना म्हणाले की, निवडकर्त्यांना जर कोणी सडपातळ हवे असेल, तर त्यांनी फॅशन शोमधून मॉडेल निवडायला हवे होते. ते म्हणाले की, जर तो अनफिट असेल तर शतक ठोकणे कोणासाठीही सोपे नाही. अलीकडच्या काळात सरफराजने निवड समितीचे दरवाजे ठोठावण्यासाठी खूप शतके झळकावली आहेत.

सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्स टुडेला सांगितले की, “दिवसाच्या शेवटी, जर तुम्ही अनफिट असाल, तर तुम्ही शतक करू शकणार नाही. त्यामुळे क्रिकेटसाठी फिटनेस महत्त्वाचा आहे. तुम्हाला यो-यो चाचणी हवी आहे, याला माझी हरकत नाही, पण यो-यो चाचणी हा एकमेव निकष असू शकत नाही. तो माणूस क्रिकेटसाठीही तंदुरुस्त आहे याची तुम्हाला खात्री करावी लागेल. जर तो माणूस क्रिकेटसाठी तंदुरुस्त असेल तर मला नाही वाटत काही फरक पडतो.”

ते पुढे म्हणाले, “तो शतक झळकावून मैदानाबाहेर जात नाही. तो पुन्हा मैदानात येतो. या सगळ्यावरून हा माणूस क्रिकेटसाठी योग्य असल्याचे दिसून येते. जर तुम्ही स्लीम आणि ट्रिम मुले शोधत असाल तर तुम्ही फॅशन शोमध्ये जाऊन काही मॉडेल्स घ्यावे आणि मग त्यांना बॅट आणि बॉल द्या आणि मग त्यांना सामील करा. तुमच्याकडे सर्व शेफ आणि साईजचे क्रिकेटपटू आहेत. आकारा पाहून करु नका, परंतु धावा आणि विकेट पाहून निवड करा.”

हेही वाचा – PSG vs Riyadh XI: Messi आणि Ronaldo सोबत हस्तांदोलन करण्यासाठी पोहोचले अमिताभ बच्चन, फोटो व्हायरल

सरफराज गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत असून सातत्यपूर्ण खेळीही खेळत आहे. गेल्या तीन हंगामात त्याने एकूण २४४१ धावा केल्या आहेत, पण भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यात तो अपयशी ठरला आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये सूर्यकुमार आणि इशान किशन या खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सरफराजकडे दुर्लक्ष करण्यावर तज्ञ आणि चाहत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If you want slim boys go to fashion shows sunil gavaskar scolded the selectors for not getting sarfaraz a place vbm