Kabaddi Team Captain on Asian Games 2023: पवन सेहरावतसाठी गेले काही महिने खूप खास होते. दुखापतीनंतर तो अखेर कबड्डी मॅटवर परतला आणि नुकत्याच पार पडलेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करून ऐतिहासिक विजय मिळवला. पवनने केवळ कर्णधारच नाही पण रेडर म्हणूनही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आगामी प्रो-कबड्डी लीग आणि आशियाई खेळ २०२३च्या तयारीबद्दल सूचक वक्तव्य केले आहे. सप्टेंबरमध्ये आशियाई स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

भारतीय संघा पुढील आव्हान आशियाई क्रीडा स्पर्धेचे असणार आहे आणि त्यासाठी पवन अँड कंपनी सज्ज झाली आहे. स्पोर्ट्सकीडाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीबाबत विचारलेल्या प्रश्नाबाबत पवन म्हणाला, “मला बचावात खूप सुधारणा हवी आहे. सामन्यादरम्यान आम्ही ३-४-५ च्या बचावाचा सराव केला होता, त्यात आमच्याकडे १० टक्केही चांगले खेळलो नाही. जर बचाव करताना ३,४ किंवा ५ खेळाडू असताना आम्ही आमचा खेळ उंचावला तर आम्ही नक्कीच जिंकू शकतो. आमची कामगिरी ही काही प्रमाणात सुधारली आहे मात्र, मी पूर्णपणे खूश नाही.”

Vijay Hazare Trophy Mumbai Beat Arunachal Pradesh by 9 Wickets Under Shardul Thakur Captaincy
Vijay Hazare Trophy: शार्दूल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने उडवला अरुणाचलचा धुव्वा; अवघ्या ३३ चेंडूत जिंकला सामना
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Rohit Sharma To Open in MCG Test Confirms India Assistant Coach Abhishek Nayar IND vs AUS
IND vs AUS: रोहित शर्मा मेलबर्न कसोटीत कितव्या क्रमांकावर फलंदाजी करणार? अखेर गूढ उकललं; कोचने दिले मोठे अपडेट
Virat Kohli Will Face Banned or Fined Over Sam Konstas On Field Controversy ICC Rules E
IND vs AUS: विराट कोहलीवर एका सामन्याची बंदी की दंडात्मक कारवाई? कोन्स्टासबरोबरच्या धक्काबुक्कीचा काय होणार परिणाम, वाचा ICCचा नियम
Tanush Kotian set to replace R Ashwin in India Test squad for last two Australia Tests IND vs AUS
IND vs AUS: टीम इंडियात अश्विनच्या निवृत्तीनंतर मोठा बदल, मुंबई क्रिकेट संघाच्या ‘या’ खेळाडूला दिली संधी
Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय
Pakistan become 1st team to whitewash South Africa at home in ODI bilaterals PAK vs SA
PAK vs SA: पाकिस्तान संघाने एकतर्फी मालिका विजय मिळवत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच संघ
Will BJP win in Delhi this year Is the election challenging for AAP
दिल्लीत यंदा भाजपची बाजी? ‘आप’साठी निवडणूक आव्हानात्मक का?

पुढे सेहरावत बोलताना म्हणाला की, “आम्ही सामना सहज एकतर्फी करू शकलो असतो. आम्ही १० गुणांनी अंतिम फेरी जिंकली, पण त्याआधी इराणविरुद्ध, आम्ही फक्त ३-४ गुणच मिळवू शकलो. जर आमचा बचाव उत्तम राहिला असता तर तोही आमच्यासाठी एक सोपा विजय ठरू शकला असता. आमचे सराव शिबिर लवकरच सुरू होईल आणि आम्ही निश्चितपणे त्यावर काम करू. जर तुम्हाला गोल्ड जिंकायचे असेल तर अधिक मेहनत करावी लागेल.”

सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यासाठी भारतीय संघ निश्चितच प्रबळ दावेदार म्हणून उदयास येईल, पण संघावर दबाव मात्र तसाच असेल. यामागचे कारण होते २०१८ आशियाई खेळ, जिथे संघ इराणविरुद्ध उपांत्य फेरीत दारूण पराभव पत्करावा लागला होता. भारताला त्यावेळी कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. याच कारणामुळे यावेळी भारताकडून सर्वांना सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. पवन ९ वर्षांचा दुष्काळ संपवू शकणार का? हे पाहावे लागेल.

आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये पवन सेहरावतवर कोणतेही दडपण नव्हते

माहितीसाठी की, संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ एकही सामना हरला नाही. भारताने साखळी फेरीत दक्षिण कोरिया, चायनीज तैपेई, जपान, हाँगकाँग आणि इराण या संघांना पराभूत केले. यानंतर भारताने अंतिम फेरीत इराणचा पराभव करून विजेतेपद पटकावले. दरम्यान, या संघाला सर्वात मोठी टक्कर इराणकडून मिळाली. इराणविरुद्धच्या सामन्यातही भावना उफाळून आल्या होत्या आणि काही खेळाडूंमध्ये मतभेदही पाहायला मिळाले होते.

मात्र, पवनच्या म्हणण्यानुसार, कर्णधार असताना तो अजिबात दडपणाखाली नव्हता आणि त्याच्या डोक्यात प्लॅन फॉलो करण्याचा त्याचा प्रयत्न होता. कर्णधारपदाबद्दल बोलताना पवन सेहरावत म्हणाला, “”मी अजिबात दडपण घेत नाही. इराण, कोरिया किंवा कोणत्याही विरोधी संघाविरुद्ध खेळताना आमच्यावर फारसे दडपण नव्हते. राष्ट्रीय कर्णधार असो किंवा पीकेएलमध्ये कर्णधारपद असो, माझ्यासाठी हे सोपे होते. मी जेव्हाही मॅटवर जातो. तेव्हा माझ्या योजनेनुसार खेळतो. प्रशिक्षकांच्या योजना असतात, पण माझ्याही काही वेगळे प्लॅन असतात. मी विरोधी पक्षांच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो.”

हेही वाचा: Rinku Singh: विंडीज मालिकेत IPL फिनिशर रिंकू सिंगला स्थान नाही; टी२० संघ निवडीत कोणते पाच महत्त्वाचे निकष होते?

दरम्यान, कर्णधार या नात्याने तो नेहमी चुकीच्या विरोधात उभा राहतो, मग त्याला रेफ्रींच्या विरोधात का जावे लागू नये, असे पवनने स्पष्ट केले आहे. त्याला आक्रमक खेळ खेळायचा असून त्याची मानसिकता तशीच असल्याचेही त्याने सांगितले. पवन कुमार सेहरावत हा प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे, त्याला PKL 9 लिलावात तामिळ थलायवासने २ कोटी २६ लाख रुपयांना विकत घेतले होते. मात्र, पहिल्याच सामन्यात दुखापतीमुळे तो संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. यावेळी पवन तामिळसाठी खेळताना दिसणार की नव्या संघाचा भाग होणार हे पाहावे लागेल.

Story img Loader