ILT20 2025 Dubai Capitals beat MI Emirates : आंतरराष्ट्रीय लीग टी-२० २०२५ (ILT20 2025) स्पर्धेला ११ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यात दुबई कॅपिटल्स आणि एमआय एमिरेट्स आमनेसामने आले होते. या रोमांचक सामन्यात दुबई कॅपिटल्सने एमआय एमिरेट्सला अवघ्या एका धावेनी पराभूत करत स्पर्धेतील आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली. सामन्याच्या एका क्षणी, एमआय एमिरेट्स सहज विजय मिळेल, असे वाटत होते. परंतु शेवटच्या षटकांमध्ये दुबई कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी सामन्याची दिशाच बदलून टाकली.

नाणेफेक जिंकल्यानंतर एमआयने सिंकदर रझाच्या नेतृत्त्वाखाली दुबई कॅपिटल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. दुबई कॅपिटल्सच्या डावाची सुरुवात काही खास झाली नाही. संघाची सलामीची जोडी ७ षटकांत ३४ धावांत पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर ब्रँडन मॅकमुलेनने संघाचा डाव सावरत हळूहळू धावा जोडल्या. मात्र, दुसऱ्या बाजून हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे संघाला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १३३ धावाच करता आल्या. ब्रँडन मॅकमुलेनने ४२ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. एमिरेट्ससाठी अफगाण गोलंदाज फजलहक फारुकीने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.

कर्णधार निकोलस पूरनचे अर्धशतक ठरले व्यर्थ –

दुबई कॅपिटल्सच्या १३३ धावांना प्रत्युत्तर देताना एमआय एमिरेट्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचे चार फलंदाज अवघ्या ४.४ षटकांत ३४ धावांत पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर कर्णधार निकोलस पूरनने एकट्याने जबाबदारी स्वीकारली आणि अकेल होसेनच्या साथीने ७९ धावांची शानदार भागीदारी केली. यादरम्याने त्याने अर्धशतक झळकावले. यानंतर एमआय एमिरेट्स हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते.

हेही वाचा – Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहबद्दल मोठी अपडेट! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ‘या’ सामन्यांना मुकणार?

u

गुलबदिन नायब ठरला सामनीवीर –

मात्र, गुलबदिन नायबने एकाच षटकात कर्णधार निकोलस पूरन आणि अल्झारी जोसेफला बाद मोठा झटका दिला. निकोलस पूरनला ४० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या जोरावर ६१ धावा करता आल्या. दोन धक्के बसल्याने एमिरेट्स संघ दडपणाखाली आला. एमिरेट्स संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती आणि किरॉन पोलार्ड क्रीजवर होता. मात्र, संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. संघाला शेवच्या षटकात केवळ ११ धावा करता आल्या. त्यामुळे संघाला अवघ्या एका धावेनी पराभवाला सामोरे जावे लागले. एमिरेट्स संघ २० षटकात ७ गडी गमावून १३२ धावाच करू शकला. दुबई कॅपिटल्सच्या विजयात गुलबदिन नायबने ३ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका निभावली. ज्यामुळे तो सामनावीर ठरला.

Story img Loader