Virat Kohli’s 500th International Match: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ४९९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या माध्यमातून तो त्याच्या कारकिर्दीतील ५००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (२० जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी बीसीसीआयने विराट कोहलीला खास शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर कोहलीने एका व्हिडीओतून सर्वांचे आभार मानले आहे.
बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट करून विराट कोहलीचा एक फोटो शेअर करण्यात आला, ज्यामध्ये सध्याचा विराट कोहली आणि काही पूर्वीचे विराट कोहली दिसत आहेत. कोहली आपला जुना दौरा आठवत आहे, अशा पद्धतीने हे चित्र तयार करण्यात आले आहे. पोस्टला “क्रिकेट कारकिर्दीच्या प्रवासाची प्रशंसा करण्याची ५०० कारणे!” असे कॅप्शन दिले होते. पुढे अभिनंदन करताना लिहिले होते की, “विराट कोहलीला त्याच्या ५००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी अभिनंदन!”
किंग कोहलीने देखील सर्वांचे आभार मानत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने म्हटले आहे की, “मी खरोखरच कृतज्ञ आहे. मी आज तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून धन्य झालो. मी भारतासाठी खेळताना इतका मोठा प्रवास करेन किंवा एवढी मोठी माझी क्रिकेटची कारकीर्द होईल असे मला कधीच वाटले नव्हते. ती कारकीर्द घडली कारण, त्यासाठी मी केलेली मेहनत, कष्ट आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्या मेहनतीचे कौतुक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! माझी खेळी पाहण्यासाठी आलेले तुम्ही सर्व चाहते आणि माझे सहकारी तुम्हा सर्वांमुळेच आज हे शक्य झाले आहे. माझे कुटुंब, माझी पत्नी, मुलगी यांनी देखील मला खूप पाठिंबा दिला. यापुढेही आणखी अशीच चांगली कामगिरी करेन असा विश्वास व्यक्त करतो.”
भारतासाठी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा चौथा खेळाडू असेल
५०० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा आकडा गाठणारा विराट कोहली भारतीय क्रिकेट संघातील चौथा खेळाडू ठरणार आहे. कोहलीच्या आधी माजी भारतीय फलंदाज आणि सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, माजी अनुभवी फलंदाज सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा टप्पा ओलांडला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत ६६४, धोनी ५३८ आणि राहुल द्रविडने ५०९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दुसरीकडे ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा कोहली जगातील १०वा खेळाडू ठरणार आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ५०० सामने खेळणारे खेळाडू
सचिन तेंडुलकर – ६६४ सामने.
महेला जयवर्धने – ६५२ सामने.
कुमार संगकारा – ५९४ सामने.
सनथ जयसूर्या – ५८६ सामने.
रिकी पॉटिंग- ५६० सामने.
महेंद्रसिंग धोनी – ५३८ सामने.
शाहिद आफ्रिदी – ५२४ सामने.
जॅक कॅलिस – ५१९ सामने.
राहुल द्रविड – ५०९ सामने.
विराट कोहली – ४९९ सामने.
आतापर्यंत ४९९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कोहलीची कामगिरी आहे
विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या ४९९ सामन्यांच्या ५५८ डावांमध्ये फलंदाजी करताना ५३.४८ च्या सरासरीने २५४६१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७५ शतके आणि १३१ अर्धशतके झळकली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २५४* धावा आहे.