आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी लोढा समितीने दिलेल्या निर्णयात त्रुटी असून आजीवन बंदीच्या निर्णयाने धक्का बसल्याची प्रतिक्रिया राज कुंद्रा यांनी ट्विटरवर व्यक्त केली आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंगी प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने मंगळवारी शिक्षा सुनावली. राज कुंद्रा आणि गुरूनाथ मयप्पन यांच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय देण्यात आला. यावर राज कुंद्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. समितीने दिलेल्या निकालाची प्रत देण्याची विनंती केली असून हा निर्णय नक्कीच धक्कादायक आणि निराशाजनक असल्याचे राज कुंद्रा म्हणाले.

Story img Loader