Imane Khelif filed complaint online harassment : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत अल्जेरियन बॉक्सर इमेन खलिफ स्त्री की पुरूष खेळाडू वादामुळे प्रकाश झोतात आली होती. इमेन युरोपियन बॉक्सर अँजेला कॅरिनीनेविरुद्धच्या सामन्यानंतर चर्चेत आली होती. कॅरिनीने दावा केला होती की खलीफने ज्याप्रकारे ठोसा मारला होता, तसा ठसा मला आजपर्यंत कोणीच मारला नव्हता. यानंतर अल्जेरियन बॉक्सरला महिला नसून पुरुष असल्याच्या टीकेला सामोरे जावे लागले. आता शुक्रवारी झालेल्या सामन्यात खलीफने चीनच्या यांग लिऊचा ५-० असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. यानंतर इमेन खलिफने ट्रोलर्सला धडा शिकवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. तिने ऑनलाइन छळ होत असल्याची तक्रार दाखल केली आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमेन अपात्र ठरली होती –
शनिवारी खलीफ म्हणाली, सोशल मीडियावर माझ्याबद्दल जे काही बोलले जात आहे ते अनैतिक आहे. मला जगभरातील लोकांची विचारसरणी बदलायची आहे. विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिला बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी मिळाली असतानाही अनेक खेळाडूंनी इमेन खलिफविरुद्ध खेळण्यासाठी इंटरेस्ट दाखवला नव्हता. २०२३ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इमेनला अपात्र ठरवण्यात आले होते. त्याचवेळी तिच्या ऑलिम्पिकमधील सहभागावरही प्रश्न उपस्थित केले जात होते.
इमेनला महिला नसून पुरुष असल्याच्या टीकेला सामोरे जावे लागले –
पॅरिस ऑलिम्पिकच्या पहिल्या सामन्यात तिने तिची प्रतिस्पर्धी अँजेला कॅरिनीच्या नाकावर जोरदार ठोसा मारला होता. त्यानंतर कॅरिनीने ४६ सेकंदानंतर सामन्यातून माघार घेतली. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) अल्जेरियाच्या इमेन आणि तैवानच्या लिन यू-टिंगवर एक निवेदन जारी केले आणि म्हटले की दोघेही खेळण्यास पात्र आहेत. युरोपियन बॉक्सर अँजेला कॅरिनीने दावा केला होती की खलीफने इतर कोणीही मारला नव्हता, तस ठोसा मारला. यामुळे अल्जेरियन बॉक्सरला महिला नसून पुरुष असल्याच्या टीकेला सामोरे जावे लागले.
काही लोक माझ्या यशाचे शत्रू – इमेन खलिफ
यानंतर सोशल मीडियावर तिच्याविरोधात बरेच लिहिण्यात आले. त्याचवेळी तिच्या महिला असण्यावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, आता इमेनने कायद्याचा आधार घेण्याचे ठरवले आहे. शुक्रवारी झालेल्या ६६ किलो महिलांच्या अंतिम सामन्यात खलीफने चीनच्या यांग लिऊचा ५-० असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. यानंतर ती लिंग वादावर खुलेपणाने बोलली. तिने सांगितले की ती एक महिला आहे आणि तिचे आयुष्य एका सामन्य महिलेप्रमाणे जगत आहे. सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इमेन खलिफ म्हणाली, “मी इतर महिलांप्रमाणेच एक स्त्री आहे. मी स्त्री म्हणून जन्माला आले आणि मी माझे आयुष्य एक स्त्री म्हणून जगले, पण काही लोक माझ्या यशाचे शत्रू आहेत आणि ते माझे यश पचवू शकत नाहीत.”
© IE Online Media Services (P) Ltd