Imane Khalif News: भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. अशात अल्जेरियाच्या एका बॉक्सरमुळे पॅरीस ऑलिम्पिकमध्ये खळबळ उडाली आहे. इमेन खलिफ या अल्जेरियाच्या खेळाडू विरोधातला सामना सुरु झाल्यानंतर तिच्या प्रतिस्पर्धी महिला बॉक्सरने ४६ सेकंदात तो सामना सोडला. पुरुषी गुणधर्म असून इमेनला महिलांच्या श्रेणीत का खेळवलं? असा सवाल उपस्थित करत हा वाद रंगला. आता या प्रकरणात गायिका चिन्मयी श्रीपदाने इमेन खलिफची बाजू घेतली आहे. इमेन खलिफ ( Imane Khalif ) ही जन्माने मुलगीच आहे, मुलगा नाही किंवा पुरुष नाही. एक पोस्ट करत चिन्मयी श्रीपदाने हा दावा केला आहे.

गायिका चिन्मयी श्रीपदाने घेतली इमेन खलिफची बाजू

गायिका चिन्मयी श्रीपदा ही तिच्या गाण्यांसाठी जशी ओळखली जाते त्याचप्रमाणे ती महिलांसाठी चळवळ राबवणारीही आहे. तिने आता या अल्जेरियन महिला खेळाडू इमेन खलिफची ( Imane Khalif ) बाजू घेतली आहे. तसंच काही फोटो पोस्ट करत इमेन ही महिलाच आहे असा दावा केला आहे. इमेन खलिफच्या ( Imane Khalif ) पुरुषी गुणधर्मांवरुन तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं तसंच तिच्याबाबत प्रश्नही उपस्थित करण्यात आले. आता गायिका चिन्मयी श्रीपदाने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Nagpur video | a Foreigner Befriends Elephant
फॉरेनरने केली नागपुरच्या हत्तीबरोबर मैत्री; गणेशोत्सवातील VIDEO होतोय व्हायरल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
Leader of Opposition in Lok Sabha and Congress MP Rahul Gandhi and party General Secretary Priyanka Gandhi Vadra
Ujjain Rape News: उज्जैनमधील उघड्यावर बलात्कार प्रकरण मानवतेला कलंक; राहुल गांधी, प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप
Dinesh Karthik apologized to Dhonis fans
Dinesh Karthik : ‘माझ्याकडून मोठी चूक झाली…’, धोनीबाबत झालेल्या ‘त्या’ चुकीबद्दल दिनेश कार्तिकने मागितली माफी
The High Court acquitted three doctors in Bandra West in the death of a minor girl who performed surrogacy Mumbai news
स्त्रीबीज दानावेळी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे प्रकरण: तीन डॉक्टर प्रकरणातून दोषमुक्त
Sourav ganguly trolled insensitive comment
Sourav Ganguly : ‘अशा घटना जगभर घडतात…’, कोलकाता प्रकरणावरील वक्तव्य सौरव गांगुलीला भोवलं, जारी केलं निवेदन
What Supriya Sule Said About Badlapur Crime
Badlapur Crime : “भर चौकात नराधमांना फाशी देत नाही तोपर्यंत..”, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

काय आहे चिन्मयी श्रीपदाची पोस्ट?

चिन्मयी श्रीपदाने इमेन खलिफचे ( Imane Khalif ) लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. Imane Khelif is Born Woman and She is Not Man अशी पोस्ट करत हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. इमेनमध्ये पुरुषी गुणधर्म असतील पण ती ज्या अल्जेरिया या देशाचं प्रतिनिधीत्व करते तिथे लिंगबदल करणे बेकायदेशीर आहे. भारतीयांनी शांती सौंदरराजन या हुशार क्रीडापटूचाही असाच छळ केला होता कारण ती दिसायला स्त्रीसारखी नव्हती. आता इमेनला ट्रोल करुन तिला जागतिक स्तरावर छळलं जातं आहे. असं म्हणत चिन्मयी श्रीपदाने इमेनची बाजू घेतली आहे.

इमेन खलिफचं प्रकरण नेमकं काय?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियाच्या इमेन खलिफचा ( Imane Khalif ) सामना इटलीच्या अँजेला कॅरिनीसोबत होता. २५ वर्षीय अँजेला कॅरिनीला समर्थन देण्यासाठी इटलीचे क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणावर पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजमधील स्टेडियमवर उपस्थित होते. पण सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या ४६ सेकंदांत संपला. कारण अँजेल कॅरिनीनं सामना सोडत असल्याचं जाहीर केलं. उपस्थित प्रेक्षकांना याचं नेमकं कारण तेव्हा कळलं नाही. पण नंतर मात्र या सगळ्या प्रकाराचं कारण समोर आलं.

हे पण वाचा- Paris Olympic 2024: इमेन खलिफ ‘पुरूषत्त्वाच्या’ मोठ्या वादानंतर मुलींविरूद्ध पुढील बॉक्सिंग सामने खेळणार? IOCने स्पष्टीकरण देत दिलं उत्तर

बॉक्सिंग रिंगमध्ये गेल्यानंतर पुढच्या ४६ सेकंदांत कॅरिनीला इमेन खलिफकडून ( Imane Khalif ) दोन ते तीन वेळा थेट चेहऱ्यावर प्रहार सहन करावे लागले. यात तिचं हेडगिअरही सैल झालं. कॅरिनी लगेच रिंगच्या कोपऱ्यात उभ्या प्रशिक्षकाकडे गेली आणि त्यांनी सामना सोडत असल्याचं जाहीर केलं. यानंतर कॅरिनी रिंगमध्ये गुडघ्यावर बसून ओक्साबोक्शी रडू लागली. सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना कॅरिनीनं असं करण्यामागचं कारण सांगितलं.

Imane Khelif Controversy IOC PBU Gives Bold Statement
इमेन खलिफ ऑलिम्पिकमधील पुढील सामने खेळणार?

काय म्हणाली अँजेल कॅरिनी?

अँजेलनं सांगितलं की त्या ४६ सेकंदांत इमेन खलिफनं ( Imane Khalif ) लगावलेल्या पंचच्या वेदना खूप जास्त होत्या. “मला तेव्हा माझ्या नाकावर खूप जास्त वेदना होऊ लागल्या होत्या. मी एक अनुभवी आणि प्रगल्भ बॉक्सर आहे. त्यामुळे सगळ्याचा सारासार विचार करून मी थांबणंच योग्य असल्याचं सांगितलं. कारण मला आणखी गंभीर परिणाम नको होते. त्यामुळे मी सामना संपवू शकले नाही”, असं अँजेल म्हणाली.

या सगळ्या प्रकरणानंतर इमेन खलिफला प्रचंड ट्रोल केलं गेलं. मात्र हा तिचा जागतिक स्तरावरचा छळ आहे असं गायिका चिन्मयी श्रीपदाने म्हटलं आहे. तसंच ती पुरुष नाही तर स्त्रीच आहे असंही तिने स्पष्ट केलं. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.