Imane Khelif Olympic Gold Medalist Boxer Confirmed as Men in Leaked Medical Report: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी महिला बॉक्सर अल्जेरियाची इमेन खलिफ पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ऑलिम्पिक दरम्यान, खलीफ लैंगिकतेच्या मुद्द्यावरून खूप चर्चेत होती. पण हे सर्व सुरू असतानाही तिने चमकदार कामगिरी केली आणि सुवर्णपदक पटकावण्यात ती यशस्वी ठरली. मात्र, पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय ठरली असून यामागचे कारण म्हणजे एक वैद्यकीय अहवाल आहे, ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. इमेन खलिफ ही पुरूष असल्याचे या वैद्यकिय अहवालात नमूद केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वैद्यकीय अहवालात असे आढळून आले आहे की खलीफमध्ये अंडकोष आणि XY गुणसूत्र (पुरुष गुणसूत्र) आहेत, जे फाईव अल्फा रिडक्टेज अपुरेपणा नावाचा विकार असल्याचे लक्षण आहे. पॅरिस ऑलिम्पिकदरम्यानही खलिफविरुद्ध खेळणाऱ्या काही महिला बॉक्सर्सनी हावभावातून हे सूचित केले होते. मात्र, त्यावेळी ऑलिम्पिक समितीने खलिफच्या खेळावर कोणतीही बंदी घातली नव्हती. खलीफने या सामन्यात चीनच्या यांग लिऊचा ५-० असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले.

हेही वाचा – IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेचं कसं असणार वेळापत्रक? भारतीय वेळेनुसार किती वाजता असणार सामना?

जून २०२३ मध्ये पॅरिसमधील क्रेमलिन-बिसेट्रे हॉस्पिटल आणि अल्जियर्समधील मोहम्मद लमाइन डेबघाइन हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केल्याचे सांगण्यात आले. तपशीलवार अहवालात, खलीफची जैविक वैशिष्ट्ये, जसे की अंतर्गत अंडकोषांचे अस्तित्व आणि गर्भाशय नसणे. रेडक्सने नोंदवल्याप्रमाणे एमआरआय अहवालातही मायक्रोपेनिस असल्याचेही दिसले आहे.

हेही वाचा – Virat Kohli: विराट कोहलीची संपत्ती किती? क्रिकेटव्यतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत काय? एका सोशल मीडिया पोस्टसाठी घेतो तब्बल…

इमेन खलिफ ही पुरूष असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होताच भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने यावर कमेंट केली आहे. हरभजन सिंगने लिहिले की तिचे सुवर्णपदक परत घ्या, हे अजिबातच योग्य नाही. असे लिहित त्याने ऑलिम्पिकला टॅग केले आहे.

हेही वाचा – Virat Kohli Birthday : विराट कोहलीला वाढदिवसानिमित्त चाहत्याकडून मिळाले खास गिफ्ट, VIDEO होतोय व्हायरल

ऑलिम्पिकदरम्यान सुरू असलेल्या लैंगिक वादावर खलीफने वक्तव्य केले होते आणि म्हणाली की, मी इतर महिलांप्रमाणेच एक महिला आहे. मी एक स्त्री म्हणून जन्माला आले आहे आणि मी एक स्त्री म्हणून आयुष्य जगले आहे, पण काही लोक माझ्या यशाचे शत्रू आहेत आणि ते माझे यश पचवू शकत नाहीत.

२०२३ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खलीफला अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर तिच्या ऑलिम्पिकमधील सहभागावरही प्रश्न उपस्थित केले जात होते. पहिल्या सामन्यात तिने तिची प्रतिस्पर्धी अँजेला कारिनीच्या नाकावर जोरदार मुक्का मारला, त्यानंतर ४६ सेकंदानंतर अँजेला हिने सामन्यातून माघार घेतली. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) अल्जेरियाचा खलीफ आणि तैवानचा लिन यू-टिंग यांच्याबाबत एक निवेदन जारी केले आणि म्हटले की दोघेही खेळण्यासाठी पात्र आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imane khelif olympic gold medalist boxer confirmed as men in leaked medical report bdg