Imane Khelif Transformation Video Viral: स्त्री की पुरूष खेळाडू या वादात अडकलेल्या अल्जेरियन बॉक्सर इमाने खलीफने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये महिलांच्या ६६ किलो बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. मात्र, इमेन खलीफ तिच्या विजयापेक्षा लिंग वादामुळे जास्त चर्चेत होती. तिच्यावरून बरेच वाद झाले. दरम्यान, इमेनने तिच्या ग्लॅमरस ट्रान्सफॉर्मेशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चांगलाच व्हायरल झाला आहे.
इमेन खलिफने या व्हिडिओमध्ये पिंक कलरचा ड्रेस आणि छान मेकअप केलेला दिसत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तिने लैंगिक वादावर मोठा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. इमेनचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने पुढे लिहिले की, जसं की मिश्या या पुरूष असल्याचे परिभाषित करत नाहीत, त्याचप्रमाणे कपडे आणि मेकअप स्त्रीच्या सौंदर्याची व्याख्या करत नाहीत.
अलीकडेच, अल्जेरियन बॉक्सर इमेन खलीफेने पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान तिच्या लिंग पडताळणीच्या खोट्या दाव्यासह ऑनलाइन छळवणुकीविरोधात फ्रान्समध्ये कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची चौकशीही सुरू झाली आहे. तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सला टार्गेट केले होते. एक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी देखील एका पोस्टचे समर्थन केले होते ज्यामध्ये असे लिहिले होते की महिलांच्या खेळात पुरुषांचे काय काम आहे.
इटलीच्या अँजेला कारिनीने काही सेकंदातच इमेन खलिफविरुद्धच्या सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी असा दावा करण्यात आला की तो पुरुष आहे आणि २०२३ मध्ये बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सुवर्णपदक सामन्याच्या काही तास आधी तिला अपात्र घोषित करण्यात आले आहे. त्यानंतर इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन (IBA) ने आपल्या अहवालात तिचे गुणसूत्र XY असल्याचे आढळले होते, त्यामुळे ती महिलांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकली नाही.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये घडलेल्या या संपूर्ण प्रकरणानंतरही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने तिला पूर्ण स्पर्धा खेळण्याची परवानगी दिली आणि तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियासाठी सुवर्णपदक पटकावले.
© IE Online Media Services (P) Ltd