मुंबई पोलिसांकडून आल्याचे सांगून एस. श्रीशांतच्या वडिलांची भेट घेऊ इच्छिणाऱ्या एका तोतया पोलिसाला अटक करण्यात आली. नीलेश रामचंद्रन जगताप उर्फ सचिन असे या ३२ वर्षीय तोतया पोलिसाचे नाव आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मी जवळचा माणूस असून तुमच्या मुलाला मदत करू शकतो, असे श्रीशांतच्या वडिलांना गेटबाहेरूनच सांगत होता. पण त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला गेटबाहेरच थांबण्यास सांगण्यात आले. श्रीशांतच्या कुटुंबीयांना कुणीही भेटण्यास आले, तर आम्हाला कळवा, असे पोलिसांनी पहारेकऱ्यांना सांगितले होते. त्यावरून पहारेकऱ्यांनी पोलिसांना फोन केला आणि नंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Story img Loader