सध्या लोकांना ‘फास्ट फूड’ जास्त आवडते, तसेच क्रिकेटमध्येही सध्याच्या घडीला ट्वेन्टी-२० क्रिकेट रुजलेले दिसत आहे. गेल्या वर्षांपर्यंत प्रत्येक दौऱ्यात एखादा ट्वेन्टी-२० सामना खेळवला जायचा; पण या वर्षी मात्र ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या मालिका पाहायला मिळाल्या. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटपेक्षा साडेतीन तासांच्या या थरारपटाला सध्याच्या पिढीने चांगलेच डोक्यावर घेतले आहे. पुढच्या वर्षी भारतामध्ये ट्वेन्टी-२० क्रिकेट विश्वचषक खेळवण्यात येणार असून यावर साऱ्यांच्या नजरा असतील. भारताने सुरुवातीला ट्वेन्टी-२० क्रिकेटकडे पाठ फिरवली होती. पहिला ट्वेन्टी-२० क्रिकेट विश्वचषक जिंकल्यावर भारतात आयपीएल पर्व सुरू झाले; पण आयपीएलला प्रारंभ झाल्यापासून भारताला एकदाही ट्वेन्टी-२० क्रिकेट विश्वचषकावर आपले नाव कोरता आलेले नाही, हेही तेवढेच खरे आहे.
या वर्षांमध्ये सर्वात जास्त ११ सामने अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्या नावावर आहेत, तर या वर्षांत ऑस्ट्रेलियासारख्या देशाने फक्त एकच ट्वेन्टी-२० क्रिकेट सामना खेळला आहे आणि त्यामध्येही त्यांना इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. ट्वेन्टी-२०मध्ये भारताच्या संघावर साऱ्यांच्याच नजरा असतात; पण या वर्षभरात भारताने चार सामने खेळले आणि त्यामध्ये त्यांना फक्त एकच सामना जिंकता आला. दक्षिण आफ्रिकेने तर भारताला ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये पुरते नामोहरम केले.
पाकिस्तानची नेत्रदीपक कामगिरी
या वर्षांची सुरुवात वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेने झाली होती. दक्षिण आफ्रिका जिंकेल असा जवळपास साऱ्यांचाच होरा असला तरी वेस्ट इंडिजने त्यांना २-१ असे पराभूत केले होते. या वर्षी ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये सर्वात चांगला खेळ पाकिस्तानकडून पाहायला मिळाला. बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचा संघ दोन सामन्यांची मालिका खेळला आणि यामध्ये पाकिस्तानने निर्भेळ यश मिळवले होते. पाकिस्तानने त्यानंतर तब्बल दोनदा ट्वेन्टी-२० मालिकेत २-० असे श्रीलंका आणि झिम्बाब्वेवर निर्भेळ यश मिळवले, तर वर्षांतील अखेरच्या मालिकेत पाकिस्तानने इंग्लंडवर ३-० असा दणदणीत विजय मिळवला. एकंदरीत या वर्षांत पाकिस्तानने ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेनेही बांगलादेशला दोन सामन्यांच्या मालिकेत पुरते निष्प्रभ केले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यात दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात आली आणि ही मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. झिम्बाब्वेने या दोन्ही सामन्यांत भारताला चांगली लढत दिली, पण त्यांना एकच सामना जिंकता आला. भारतामध्ये येऊन दोन्ही ट्वेन्टी-२० सामने जिंकत दक्षिण आफ्रिकेने आम्हीच आगामी विश्वचषकाचे प्रबळ दावेदार असल्याचे ठणकावून सांगितले. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका व झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
मुंबई इंडियन्सला आयपीएलचे जेतेपद
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या आठव्या पर्वाचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत मुंबईने चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केले. या हंगामात सर्वाधिक धावा सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने (५६२) केल्या, तर सर्वाधिक बळी चेन्नई सुपर किंग्जच्या ड्वेन ब्राव्होने (२६) मिळवले.
विश्वचषकाची उत्सुकता
भारतामध्ये मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची उत्सुकता साऱ्यांनाच असेल. भारताकडे यजमानपद असल्याने त्यांना वातावरण आणि खेळपट्टय़ांचा फायदा मिळेल, असा जाणकारांचा अंदाज आहे; पण असे असले तरी दक्षिण आफ्रिकेने दोन्ही ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताला पराभूत केले होते. त्यामुळे या विश्वचषकात नेमका कोणता संघ जिंकेल, हे सांगणे कठीण आहे. त्याचबरोबर पाकिस्तानने या वर्षांत दमदार कामगिरी केली असून त्यांच्याकडेही संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेच्या संघांकडून कडवी झुंज मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत भारत, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांनी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे या वेळी नवा विश्वविजेता पाहायला मिळणार, की यापैकी कुणी एक पुन्हा एकदा जेतेपद पटकावणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
पाकिस्तान खेळणार का?
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील प्रस्तावित मर्यादित षटकांच्या मालिकेचा दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे ते भारताशी आणि भारतामध्ये खेळणार का? हा सर्वात मोठा प्रश्न असेल. पाकिस्तानला भारतातील काही राज्यांमधील विरोध पाहता त्यांचे सामने कुठे खेळवायचे आणि किती सुरक्षा द्यायची याचा विचार बीसीसीआयबरोबर भारतीय सरकारलाही करावा लागेल. विश्वचषकासारखी मोठी स्पर्धा पाहता यावर पाकिस्तान बहिष्कार घालण्याची शक्यता कमीच आहे; पण येत्या काही दिवसांमध्ये याविषयीचे राजकारण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
prasad.lad@expressindia.com