Imran Khan Statement On BCCI : पाकिस्तानचे विश्वकप विजेता आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर निशाणा साधला आहे. भारत पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळायची परवानगी देत नाही. पाकिस्तानी खेळाडूंनी याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही. जेव्हा आयपीएल सुरू झाली होती, तेव्हा या लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचाही सहभाग होता. पण मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून बाहेर काढलं होतं. २००८ पासून पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळत नाहीत, असं इम्रान खान यांनी टाइम्स रेडिओला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

इम्रान खानने मुलाखतीत पुढं म्हटलं की, भारतीय क्रिकेट बोर्ड पाकिस्तानी खेळाडूंना अंहकार दाखवत आहे. पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली जात नाहीय. हे अहंकाराच्या भावनेतून केलं जात आहे. हे खूप विचित्र आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आता अहंकारी झालं आहे. कारण त्यांना भरपूर निधी मिळत आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. क्रिकेटच्या जगात भारत महाशक्तीच्या रूपात समोर आला आहे, त्यामुळे त्यांच्यात अहंकार भरला आहे. खूप पैसा मिळत असल्याने भारतीय बोर्ड अंहकारी भावनेतून व्यवहार करत आहे. त्यांची हुकूमशाही सुरू आहे. कुणासोबत खेळायचं आणि कुणासोबत नाही, याचा निर्णय तेच घेतात.

नक्की वाचा – गुजरात टायटन्सविरोधात पराभव झाल्यानंतर एम एस धोनीनं केला खुलासा; म्हणाला, “आमच्याकडून ही चूक झाली आणि…”

एशिया कप होणार रद्द?

पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हटले, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे एशिया कप २०२३ रद्द होण्याची दाट शक्यता आहे. आता जास्त वेळ शिल्लक नाहीय. जरी टूर्नामेंटच्या तारखा जाहीर झाल्या असल्या, तरीही पूर्ण शेड्यूल अजून घोषित करण्यात आलेले नाही. याच कारणामुळे यंदाचा एशिया कप रद्द होऊ शकतो. रमीज राजा जेव्हा पीसीबीचे चेअरमन होते, तेव्हा त्यांनी स्पष्टच सांगितले होते की, “जर भारताने त्यांच्या संघाला एशिया कपसाठी पाकिस्तानात पाठवले नाही, तर वनडे वर्ल्डकपसाठी पाकिस्तानही त्यांचा संघ भारतात पाठवणार नाही.”

Story img Loader