Rohit Was Dropped In World Cup 2011: रोहितने इंडियन प्रीमियर लीग टीम मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पाच खिताब जिंकले आहेत. त्याचबरोबर भारतीय कर्णधार म्हणून त्याने २०१८ मध्ये आशिया कप विजेतेपद जिंकले आहे.आता टीम इंडिया २०२३ चा विश्वचषक रोहितच्या नेतृत्वाखाली घरच्या मैदानावर खेळणार आहे. तत्पुर्वी रोहित शर्माने २०११ सालच्या विश्वचषकमधील त्याचा एक किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोहितने शेअर केला हृदयद्रावक क्षण –

रोहित शर्माचे लक्ष्य १० वर्षांपासून सुरू असलेला आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यावर असणार आहे. तसेच रोहितसमोर आता १८ पैकी किमान तीन खेळाडूंना कोअर ग्रुपमधील १५ जणांच्या संघात स्थान मिळणार नाही. असे सांगण्याचे कठीण आव्हान आहे. रोहित जेव्हा २३ वर्षांचा होता. तेव्हा त्यालाही २०११ च्या विश्वचषक चॅम्पियन संघात स्थान मिळाले नव्हते. संघात नसण्याचे दुःख त्याच्यापेक्षा चांगले कोणाला माहिती असू शकते.

आशिया कपमध्ये सामील होण्यापूर्वी रोहितने पीटीआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले, “सर्वोत्तम संयोजन निवडताना, असे खेळाडू असतील जे विविध कारणांमुळे संघात स्थान मिळवू शकणार नाहीत. मी आणि राहुल भाईने (द्रविड) खेळाडूंना ते का संघाचा भाग नाहीत हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तो पुढे म्हणाला. म्हणाला, “कधी कधी मी स्वतःला त्यांच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करतो. २०११ मध्ये जेव्हा माझी निवड झाली नव्हती, तेव्हा तो माझ्यासाठी हृदयद्रावक क्षण होता आणि मला माहित आहे की विश्वचषक संघातून वगळण्यात आल्याने कसे वाटते.”

हेही वाचा – SA vs AUS: विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! कमिन्स-स्टार्क पाठोपाठ ‘या’ अष्टपैलू खेळाडूलाही झाली दुखापत

कधी कधी त्याचे आणि द्रविडचे निर्णय चुकीचे असू शकतात हे मान्य करायला रोहितला काहीच हरकत नाही. तो म्हणाला, “मी, प्रशिक्षक आणि निवडकर्ते विरोधी संघ, पृष्ठभाग, आमची ताकद, त्यांची कमकुवतता यासारख्या सर्व बाबी पाहतो आणि मग निर्णय घेतो. आपण नेहमीच परिपूर्ण नसतो अशी प्रत्येक शक्यता असते.” भारतीय कर्णधार म्हणाला, “शेवटी काही व्यक्ती ठरवतात आणि माणूस म्हणून आपण चुका करू शकतो. आम्ही नेहमीच बरोबर नसतो.”

हेही वाचा – Asia Cup 2023: विराट कोहलीसोबत पंगा घेणारा नवीन-उल-हक अफगाणिस्तान संघातून झाला बाहेर, इन्स्टावर पोस्ट करत व्यक्त केली नाराजी

युवीने रोहितला बोलावले होते रूममध्ये –

२०११ च्या विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्यानंतर त्याचे सांत्वन कोणी केले असे विचारले असता, रोहित म्हणाला, “मी दुःखी होतो आणि माझ्या खोलीत बसलो होतो. मला आठवते की युवीने मला त्याच्या खोलीत बोलावून जेवायला नेले. तो मला म्हणाला, ‘सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुझ्यापुढे इतकी वर्षे आहेत’. जेव्हा आम्ही या विश्वचषकात खेळू, तेव्हा तुम्ही तुमच्या खेळावर आणि कौशल्यांवर कठोर परिश्रम करण्यासाठी आणि संघात पुनरागमन करण्यासाठी या संधीचा उपयोग करू शकता. तुम्ही भारताकडून खेळू नये किंवा विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू नये, असे काही कारण नाही.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In 2011 when rohit sharma was not selected yuvraj singh invited him to the room vbm
Show comments