BCCI Warning to Rahul Dravid: २०१३ साली शेवटच्या वेळी आयसीसी ट्रॉफी जिंकणारा भारतीय संघ आयसीसीच्या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरला, मात्र आजपर्यंत त्यांना विजेतेपद काही मिळवता आले नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंसोबतच संघाच्या सपोर्ट स्टाफलाही टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याचवेळी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आता WTC फायनलमधील पराभवानंतर संघाच्या सपोर्ट स्टाफला इशारा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयच्या सूत्राने एका स्पोर्ट्स वेबसाईटशी बोलताना सांगितले की, गोलंदाजी प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक यांच्यासोबत सपोर्ट स्टाफबाबत चर्चा होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवाच्या कारणांचाही आढावा घेतला जाईल. गोलंदाजी आणि फलंदाजी प्रशिक्षकावर बोर्ड कारवाई करू शकते. WTC फायनलमधील भारतीय संघाच्या कामगिरीनंतर इनसाइड स्पोर्ट्समध्ये प्रकाशित झालेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या विधानानुसार, एकदिवसीय विश्वचषक २०२३ला लक्षात घेऊन, या पराभवानंतर फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोर आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे यांचे स्थान काय असेल हे ठरवले जाणार आहे.

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “या सर्व गोष्टी इतक्या सोप्या नाहीत. सर्व काही ठीक नव्हते असे आपण म्हणू शकत नाही. आम्ही भारतात जिंकण्यात यशस्वी झालो. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणे हा काही विनोद नाही. पण परदेश दौऱ्यांवर आमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. दरम्यान, आपण आगामी एकदिवसीय विश्वचषक देखील लक्षात ठेवला पाहिजे, जो केवळ ४ महिन्यांवर आहे. मी विचार न करता प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मात्र अंतर्गत चर्चा नक्कीच होईल.”

हेही वाचा: Emerging Asia Cup 2023: म्हारी छोरी छोरोसे…, श्रेयंका पाटीलचे पंचक! हाँगकाँगवर भारताचा नऊ विकेट्सने दणदणीत विजय

पुढे ते अधिकारी म्हणाले की, “फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांना अपयश आल्याचे दिसत आहे. भरत अरूण यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हाम्ब्रे गोलंदाज प्रशिक्षक म्हणून आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजांनी काही चांगली कामगिरी केली. त्यात त्यांच्या कार्यकाळात दुखापतीचे सत्रही वाढले.”

राहुल द्रविडची स्थिती काय आहे?

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या पदाबद्दल बोलायचे तर तो २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत ही जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. आशिया चषक, टी२० विश्वचषक आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील पराभवानंतरही बोर्डाचा त्याच्यावर विश्वास कायम आहे. एकदिवसीय विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे द्रविडच्या प्रशिक्षक पदाबाबत अधिक चर्चा केली जाईल.

विश्वचषक २०२३ नंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. विश्वचषकातील संघाच्या कामगिरीनंतरच त्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मानले जात आहे. आता विश्वचषकाला ४ महिनेही शिल्लक नाहीत, त्यामुळे खेळाडूंवर कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ नये आणि मोठे बदल ड्रेसिंग रुममधील वातावरण बिघडू नयेत यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत आहे.

हेही वाचा: Arshdeep Singh: सिंग इज किंग! इंग्लंडच्या भूमीवर अर्शदीपचा जलवा, जबरदस्त गोलंदाजीचा Video व्हायरल

भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ

मुख्य प्रशिक्षक – राहुल द्रविड

फलंदाज प्रशिक्षक – विक्रम राठोड

गोलंदाज प्रशिक्षक – पारस म्हाम्ब्रे

फिल्डिंग प्रशिक्षक – टी दिलीप

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In case of coaching staff bcci gave ultimatum will rahul dravid be ousted before the world cup 2023 avw