Shreyanka Patil in Emerging Asia Cup 2023: उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू श्रेयंका पाटीलने दोन धावांत पाच विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताच्या २३ वर्षांखालील महिला संघाने महिला उदयोन्मुख आशिया चषक स्पर्धेत नवख्या हाँगकाँग संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. आणि आपल्या मोहिमेची दमदार सुरुवात केली. पहिल्या महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या २० वर्षीय श्रेयंकाच्या ऑफ-स्पिन गोलंदाजीसमोर हाँगकाँगचा संघ १४ षटकांत अवघ्या ३४ धावा करत गारद झाली.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पाहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हाँगकाँगसाठी केवळ एका खेळाडूला दोन आकडी धावसंख्या गाठता आली तर तब्बल ४ खेळाडूना भोपळाही फोडता आला नाही.  हाँगकाँगची सलामीवीर मारिको हिलने १९ चेंडूत सर्वाधिक १४ धावा केल्या. अंडर-१९ विश्वचषकात भारताची स्टार खेळाडू डावखुरी फिरकीपटू मन्नत कश्यप (२/२) आणि लेग-स्पिनर पार्श्वी चोप्रा (२/१२) यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले.

India Must be Missing Rahul Dravid Pakistan Former Cricketer Basit Ali Slams Gautam Gambhir and IPL Like Tactics After Whitewashed
IND vs NZ: “आज भारताला द्रविडची आठवण येत असेल…”, पाकिस्तानी माजी खेळाडूने व्हाईटवॉशनंतर गौतम गंभीरला सुनावलं, IPL रणनितीवर उपस्थित केले प्रश्न
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
anand dighe s image used by mahayuti
महायुतीच्या प्रचारपत्रकावर आनंद दिघे यांची प्रतिमा
IND vs NZ India suffered their first-ever home series whitewash in a three-match Test series, losing the third Test at the Wankhede Stadium in Mumbai by 25 runs on Sunday
IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास
Stuart Binny scoring 31 runs in last over against UAE video viral
Stuart Binny : स्टुअर्ट बिन्नीने शेवटच्या षटकात पाडला ३१ धावांचा पाऊस, तरीही यूएईविरुद्ध भारताला पत्करावा लागला पराभव, पाहा VIDEO
Mukesh Kumar sensational 6 for 46 helps India A bowl Australia A out for 195 Runs INDA vs AUSA
INDA vs AUSA: मुकेश कुमारने ६ विकेट्स घेत केला कहर, ऑस्ट्रेलिया अ १९५ वर ऑलआऊट; भारतीय अ संघाने दुसऱ्या दिवशीच घेतला बदला
IND vs NZ 3rd Test Mohammad Siraj replaced Jasprit Bumrah
IND vs NZ : जसप्रीत बुमराह मुंबई कसोटी का खेळत नाहीये? कर्णधार रोहित शर्माने सांगितले कारण
Rohit Sharma Statement After Being Retained by Mumbai Indians for less than what Jasprit Bumrah and Hardik Pandya got
Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO

प्रत्युत्तरात जी त्रिशाच्या नाबाद १९ धावांच्या खेळीमुळे भारताने ५.२  षटकांत ३८ धावा करून लक्ष्य गाठले. भारताची कर्णधार श्वेता सेहरावतला फारशी चमक दाखवता आली नाही. बेट्टी चानने तिला बाद केला. या सामन्यात श्रेयंकाला तिच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतीय महिला अ संघ या स्पर्धेतील आपला पुढचा सामना १५ जून रोजी नेपाळ अ संघाविरुद्ध खेळेल.

हेही वाचा: WTC 2023 Final: सुनील गावसकरांची भारतीय संघावर सडकून टीका; म्हणाले, “आता काय आम्ही वेस्ट इंडीज २-०, ३-०ने…”, Video व्हायरल

विराट कोहलीला पाहून श्रेयंकाने क्रिकेट खेळायला सुरुवात केली

इमर्जिंग प्लेअर किंवा युवा महिला खेळाडू म्हणून उदयास आलेली श्रेयंका पाटीलने आशिया चषक स्पर्धेत अवघ्या ३ षटकात २ धावा देऊन ५ विकेट घेत मोठा विक्रम केला होता. २० वर्षीय श्रेयंका पाटीलने आपल्या मुलाखतीत म्हटले होते की, “विराट कोहलीला पाहिल्यानंतर तिने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, मी किंग कोहलीच्या खेळीने खूप प्रभावित झाली होती.” विराट कोहलीला देवासारखा मानणाऱ्या श्रेयंका पाटीलने आपल्या करिअरची सुरुवात वेगवान गोलंदाज म्हणून केली होती, पण आता ती ऑफ-स्पिन गोलंदाज आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीत श्रेयंकाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) महिला संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. श्रेयंकाने ७ सामन्यात ६ विकेट्स घेतल्या. १७ धावांत २ विकेट्स ही तिची सर्वोत्तम कामगिरी होती.