भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन वनडे मालिका संपुष्टात आली आहे. टीम इंडियाने शनिवारी (१० डिसेंबर) तिसरा एकदिवसीय सामना जिंकून क्लीन स्वीपपासून बचाव केला. यजमानांनी मालिका २-१अशी जिंकली. तिसऱ्या सामन्यात इशान किशनने शानदार फलंदाजी करत द्विशतक झळकावले. सामन्यानंतर त्याने बीसीसीआय टीव्हीसाठी शुभमन गिलला मुलाखत दिली. यादरम्यान किशनने खुलासा केला की, सामन्यापूर्वी सराव सत्रात तो दोनदा क्लीन बोल्ड झाला होता.
भारताकडून द्विशतक झळकावणारा इशान हा चौथा फलंदाज ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी ही कामगिरी केली होती. त्याने १२६ चेंडूत द्विशतक झळकावून वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. वेस्ट इंडिजच्या या माजी सलामीवीराने २०१५ विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध २१५ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा येथे गेलने १३८ चेंडूत द्विशतक झळकावले.
शुबमन गिलने इशान किशनला विचारले की, काल (शुक्रवार) आपले सराव सत्र होते. त्यामध्ये तो का सहभागी झाला नाहीस? यावर उत्तर देताना इशान म्हणाला, ‘मी सराव सत्र कधीच चुकवत नाही. मी सदैव उपस्थित असतो.’ त्यावर शुबमनने पुन्हा विचारले, पण तू काल आला नाहीस? या प्रश्नाचे उत्तर देताना किशन म्हणाला, ‘मी तिथे होतो, कदाचित तुम्ही मला पाहिले नसेल.’
त्याचबरोबर या संभाषणादरम्यान गिलन म्हणाला, मी काल तिथे होतो. पण तू तिथे नव्हतास पण जेव्हा तुला समजले की तू प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेस तेव्हा तू सरावासाठी आलास. त्यावर किशन म्हणाला, मला दोनदा नेटमध्ये बोल्ड केले होते.
यानंतर, इशानने तिसर्या एकदिवसीय सामन्याच्या सकाळी नेट सेशनमध्ये आपल्या सहभागाबद्दल तपशीलवार माहिती दिली. तो म्हणाला, “मागील मैदानावरील नेटमधील विकेट्स चांगल्या नव्हत्या. त्यामुळे मी आज सकाळी येथे नेटमध्ये फलंदाजी करण्याचा विचार केला. इतर खेळाडूंनीही नेटमध्ये भरपूर फलंदाजी केली आणि फलंदाजीचा येथे फायदा झाला. सूर्याभाईनेही टी-20 विश्वचषकादरम्यान असेच केले आणि ते खूप यशस्वी ठरले. मीही तेच केले आणि २०० धावा केल्या.”