बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २०२३चा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. फलंदाजांना पोषक असलेल्या या खेळपट्टीवर चौथा दिवस भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने आपल्या नावे केला. तीन वर्षांपेक्षा अधिक चार कालावधीनंतर त्याने कसोटी शतक पूर्ण केले. त्याच्या १८६ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाने पहिल्या डावात ९१ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद ३ धावा केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अहमदाबाद कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची धावसंख्या बिनबाद तीन धावा आहे. मॅथ्यू कुहनेमन खाते न उघडता खेळपट्टीवर आहे. त्याचवेळी ट्रॅविस हेड तीन धावा करून त्याच्यासोबत खेळत आहे. भारताकडे अजूनही ८८ धावांची आघाडी आहे. सामन्याच्या शेवटच्या दिवशी कांगारू संघाला छोट्या धावसंख्येवर गुंडाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. भारतीय संघाने पाचव्या दिवशीच्या खेळपट्टीवर चमत्कार घडवला तर तो सामना जिंकू शकतो. जर भारतीय गोलंदाजांना विकेट्स काढता आल्या नाहीत तर सपाट खेळपट्टीवर हा सामना अनिर्णीतच्या दिशेने देखील जाऊ शकतो.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: अक्षर पटेलचे शतक हुकले मात्र फलंदाजीत रचला इतिहास, एमएस धोनीचा अनोखा विक्रम मोडला

सुनील गावसकर यांचा मॅथ्यू कुहनेमन आक्षेप

भारतीय संघाचा डाव ५७१ धावांवर संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनेमन व ट्रॅविस हेड सलामीला आहे. याचे कारण म्हणजे पहिल्या डावातील हिरो ठरलेला उस्मान ख्वाजा दुखापतग्रस्त झाला. म्हणून त्याच्या जागेवर कुहेनमन फलंदाजीला आला. त्यात दिवसातील षटक कमी होण्यासाठी किंवा कमी खेळावी लागावीत या कारणास्तव तो प्रत्येक चेंडूमागे सतत वेळकाढूपणा करत होता. कधी ग्लोव्हज काढत तर कधी हेडशी मध्येच बोलायला जात तो ३० ते ४० सेकंद वाया घालवात होता. हे रोहित शर्मा देखील थोडा नाराज झाला आणि त्याने अंपायरकडे तक्रार केली पण तरी तो तसाच वागत होता. यावर लाइव्ह सामन्यात कॉमेंट्री करताना सुनील गावसकर यांनी देखील यावर मत मांडत आक्षेप घेतला.

सुनील गावसकर म्हणाले की, “ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याने कधीचं विचार केला नसेल की मी गोलंदाजीतही सलामीला गोलंदाजी करेन आणि फलंदाजीत देखील सलामीला येऊन अवघड काळ तारून नेईल. त्याला एवढा अनुभव नाही म्हणून तो जुनी ट्रिक वेळ काढण्याची वापरत आहे. प्रत्येक चेंडूमागे सतत ग्लोव्हज काढतो आहे यावर अंपायरने त्याच्याशी बोलून सक्त ताकीद दिली पाहिजे.” असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: स्वस्तात विकेट फेकणाऱ्या जडेजाला पाहून विराटचा चढला पारा! समालोचकांनीही घेतले तोंडसुख

आतापर्यंतच्या सामन्यात काय घडलं?

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उस्मान ख्वाजाच्या १८० आणि कॅमेरून ग्रीनच्या ११४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४८० धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक सहा विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने शुबमन गिलच्या १२८, विराट कोहलीच्या १८६ आणि अक्षर पटेलच्या ७९ धावांच्या जोरावर ५७१ धावा केल्या. नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला ९१ धावांची आघाडी मिळाली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता तीन धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ind v aus 4th test kuhnemann replaces injured opener khawaja and tried to delay on which gavaskar showed unwillingness avw