अहमदाबाद कसोटीवर खलिस्तानी दहशतवाद्यांची बारीक नजर आहे. एका रिपोर्टनुसार, चौथ्या कसोटी सामन्यातील हल्ल्याशी संबंधित धमकीचे संदेश व्हायरल केले जात होते. खलिस्तानी दहशतवादी गुरपरवंत सिंग याने हे धमकीचे मेसेज व्हायरल केले आहेत. सामान्यादरम्यान अशांतता पसरवा, असे संदेशात म्हटले जात होते. पंजाबमध्ये खलिस्तानच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबाद कसोटीबाबतचा हा धोका भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी मोठा धोका आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात बाधा टाकण्यासाठी खलिस्तान समर्थक गटाकडून धमक्या मिळाल्याप्रकरणी अहमदाबाद गुन्हे शाखेच्या सायबर सेल युनिटला मोठा यश मिळाले. याप्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातून दोन आरोपींना अटक केली आहे. या धमक्या सिम बॉक्स तंत्रज्ञानाचा वापर करून दिल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज अहमदाबादमध्ये होते, तेव्हाच या धमक्या दिल्या जात होत्या. तेव्हापासून अहमदाबाद क्राइम ब्रँचचे पथक आरोपीच्या लोकेशनचा माग काढण्यात गुंतले होते. गुन्हे शाखेच्या पथकाला धमकावणाऱ्यांचे लोकेशन मध्य प्रदेश, यूपी, बिहार आणि पंजाबमधील वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळत होते.

Why is India wearing a Pink striped jersey on Day 3 of IND vs AUS 5th Test
IND vs AUS : सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने गुलाबी रंगाचे पट्टे असलेली जर्सी का घातली? जाणून घ्या कारण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
IND vs AUS : प्रसिध कृष्णाचं जबरदस्त कमबॅक! ॲलेक्स कॅरीचा उडवला त्रिफळा, VIDEO होतोय व्हायरल
IND vs AUS 5th Test Predicted Playing 11 Full Squad Players List Match Timing Live Telecast
IND vs AUS: रोहित शर्माच्या विश्रांतीच्या निर्णयानंतर प्लेइंग इलेव्हन कशी असणार? सिडनी कसोटी किती वाजता सुरू होणार?
IND vs AUS Australia Playing XI For Sydney test All Rounder Beau Webster To Debut Know About Him
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाकडून ३१ वर्षीय खेळाडू सिडनी कसोटीत करणार पदार्पण, मार्शला दाखवला बाहेरचा रस्ता; कोण आहे हा नवा अष्टपैलू?
Rohit Sharma were not the captain he might not be playing XI Irfan Pathan Big statement on Rohit Sharmas form
Rohit Sharma : ‘रोहित कर्णधार नसता तर संघातच नसता…’, हिटमॅनच्या खराब फॉर्मवर इरफान पठाणचं मोठं वक्तव्य
Navjot Singh Sidhu on Travis Head celebration
IND vs AUS, 4th Test: ट्रॅव्हिस हेडच्या कथित अश्लील सेलिब्रेशनवर सिद्धू संतापले; म्हणाले, “त्याला अशी शिक्षा द्या की…”
Australia Beat India by 184 Runs in Melbourne Test India Batting Order Collapsed AUS Take Lead in Series
IND vs AUS: मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाने मारली बाजी; शेवटच्या तासाभरात भारताने गमावल्या ७ विकेट्स

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: श्रेयस अय्यरऐवजी श्रीकर भरत फलंदाजीला आल्याने सगळेच झाले अवाक्, बीसीसीआयने दिली चिंता वाढवणारी माहिती

यासोबतच पाकिस्तानकडून वेगवेगळ्या बनावट ट्विटर हँडलवरून धमक्याही दिल्या जात होत्या. अखेर मध्य प्रदेशातील सतना आणि रीवा येथून अवैध अदलाबदली पकडण्यात आली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. आजचा खेळ भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. या चौथ्या कसोटी सामन्याचे पहिले तीन दिवस फलंदाजांच्या नावावर आहेत. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. त्यामुळेच या सामन्यादरम्यान खलिस्तानी धमकीची ही बातमी समोर आली होती.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test: ‘आता काय एवढाही विश्वास नाही का?’ विराटची फलंदाजी बघून स्मिथला आलं टेन्शन, हातात बॅट घेऊन केली चेक, पाहा Video

कसोटी सामना उधळण्याची धमकी देणाऱ्यांचे खलिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खलिस्तान समर्थक दहशतवादी गुरपरवंत सिंगच्या कार्यकर्त्यांनी अनेक धमकीचे मेसेज व्हायरल केले आहेत. धमक्या मिळाल्यानंतर गुजरात पोलिसांनी संशयितांवर कारवाई सुरू केली आहे. इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून गुजरात पोलिसांनी सौराष्ट्रात अनेकांना अटक केली आहे. यानंतर अशा घटकांमध्ये घबराट पसरली आहे. गुजरात पोलिसांच्या एटीएस, एसओजी आणि गुन्हे शाखेसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

Story img Loader