Rohit Sharma Epic Reaction on Jadeja DRS:भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यानच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात सामन्याच्या पहिल्या दोन्ही दिवशी भारतीय संघाने आपले वर्चस्व राखले. भारतीय फलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाखेर १४४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे. कर्णधार रोहित शर्माचे शतक व रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची नाबाद अर्धशतके दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले. त्यात जडेजा डीआरएस आणि त्यावर रोहित शर्माची ती रिअॅक्शन फार गाजत आहे.
जडेजा आणि रोहितने सहाव्या गड्यासाठी ६१ धावांची भागीदारी करून भारताला आवश्यक ती भागीदारी करून दिली. ऑस्ट्रेलिया ही जोडी फोडण्याच्या जवळ आली होती पण टीव्ही अंपायरने तो डाव हाणून पाडला. भारतीय डावाच्या ७८व्या षटकात, टॉड मर्फी आणि ऑस्ट्रेलियाने जडेजाविरुद्ध एलबीडब्ल्यूचे अपील केले, जे पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी नाबाद दिले. तसेच, मर्फी, यष्टिरक्षक हँड्सकॉम्ब आणि कर्णधार पॅट कमिन्स यांना हा जवळचा कॉल वाटला आणि म्हणून त्यांनी जडेजाविरुद्ध रिव्ह्यू घेतला. पण त्यात स्पष्ट दिसत होते की तो चेंडू बॅटला आधी लागला होता. पण मात्र पिचिंग आउटसाइड असल्याने तो अंपायर कॉल निघाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माची रिअॅक्शन फार मजेशीर होती. त्याने स्मित हास्यकरत मर्फीकडे पाहिले आणि त्याला खिजवले. जडेजाजवळ जाऊन तो म्हणाला की, “मी आधीच सांगितले होते यात काही दम नाही.”
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा जडेजाने त्यात आठ धावांची भर घालत तो मर्फीकरवी ७० धावांवर त्रिफळाचीत झाला. सध्या अक्षर पटेलसोबत मोहम्मद शमी खेळत असून भारताची आघाडी ही वाढत आहे. सध्या भारत ३६५/८ अशी स्तिथीत असून किमान अजून एक सेशन खेळल्यास ऑस्ट्रेलिया हा सामना गमावू शकते.
तत्पूर्वी, पहिल्या दिवशी एक बाद ७७ या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला. नाईट वॉचमन आलेल्या रविचंद्रन अश्विनने जबाबदारीने खेळ करत २३ धावा केल्या. मात्र त्यानंतर चेतेश्वर पुजारा अपयशी ठरला. पहिल्या सत्रा अखेरीस भारताने आपली धावसंख्या ३ बाद १५१ होती. उपहारानंतर मोठी धावसंख्या करण्याच्या उद्देशाने रोहित व विराट कोहली मैदानात उतरले मात्र विराट पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्याने १२ धावा केल्या. सूर्यकुमार यादव देखील आपल्या पहिल्या सामन्यात चमक दाखवू शकला नाही. त्याचवेळी रोहितने आपले नववे कसोटी शतक पूर्ण केले. रोहितने रवींद्र जडेजासह सहाव्या गड्यासाठी ६१ धावा करत संघाला आघाडीवर नेले. रोहित १२० धावांवर बाद झाल्यानंतर पहिला सामना खेळणारा भरतही फार काळ टिकू शकला नाही.
मात्र, त्यानंतर जडेजाला अक्षर पटेल याची साथ मिळाली. जडेजाने आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर अक्षरनेही वेगवान फलंदाजी करताना आपले दुसरे कसोटी अर्धशतक झळकावले. दोघांनी नाबाद १११ धावांची भागीदारी करत भारताला ७ बाद ३२१ पर्यंत पोहोचवले. ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फी याने सर्वाधिक पाच बळी मिळवले.