India vs West Indies 2nd T20: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना ६ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. या सामन्यात दोन्ही संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता प्रॉव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे होणार आहे. टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला होता. चला तर मग जाणून घेऊया दुसऱ्या टी२० मध्ये दोन्ही संघांचे प्लेइंग ११ कसे असू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी२० मालिकेतील पहिला सामना ३ ऑगस्ट रोजी खेळला गेला होता. या सामन्यात यजमान संघ वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि या सामन्यात संघाचा पराभव झाला.

एकदिवसीय मालिकेतून भारताला खूप सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि सर्वात मोठी म्हणजे इशान किशनची कामगिरी. यष्टीरक्षक फलंदाजाने सलग चार अर्धशतके झळकावली पण टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात इशानला फलंदाजीत कमाल दाखवता आली नाही. आता दुसऱ्या टी२०मध्ये या फलंदाजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. भारतासाठी आणखी एक सकारात्मक बाब म्हणजे मुकेश कुमारचा फॉर्ममध्ये आहे. या वेगवान गोलंदाजाने एकदिवसीय मालिकेत चार विकेट्स घेतल्या. त्याने त्याच्या लाइन आणि लेन्थचा अचूक टप्पा ठेवला होता.

हेही वाचा: Team India: “विराट-रोहितला विश्रांती देऊन टीम मॅनेजमेंट साध्य…”, माजी फिरकीपटूने टीम इंडियाच्या निर्णयांवर केले प्रश्न उपस्थित

या वर्षी २०२३ होणाऱ्या वन डे विश्वचषकाच्या दृष्टीने या टी२० मालिकेला फारसे महत्त्व नाही. पण कर्णधार हार्दिक पांड्या आणि उपकर्णधार सूर्यकुमार यादव यांना स्वतः ची आणि संघ म्हणून चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना एक महत्त्वाची चूक सुधारावी लागणार आहे. इशान किशन, शुबमन गिल आणि संजू सॅमसन यांची नजर सध्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकावर आहे. आशिया चषकापूर्वी काही चांगल्या खेळी खेळून त्यांना आत्मविश्वास मिळवायचा आहे.

वेस्ट इंडीज विरुद्धची ही मलिक खेळाडूंना शारीरिकरित्या खूप थकवणारी आहे. केवळ नऊ दिवसांत त्रिनिदाद आणि टोबॅगो, गयाना आणि अमेरिका या तीन देशांमध्ये पाच टी२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे हार्दिक पांड्या, शुबमन गिल, इशान किशन, फिरकीपटू कुलदीप यादव यांसह संघातील इतर खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक आहे. जरी संघात एवढे युवा खेळाडू असले तरी हा प्रवास आणि उसळत्या चेंडूवर फलंदाजी करणे हे खूप त्रासदायक गोष्ट आहे.

हेही वाचा: Dinesh Kartik: “जगातील सर्वोतम डेथ बॉलर…”, दिनेश कार्तिक बुमराह नव्हे तर ‘या’ पाकिस्तानी गोलंदाजाचा बनला चाहता

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी२० सामना: संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: शुबमन गिल, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार

वेस्ट इंडिज: काइल मेयर्स, ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल (कर्णधार), जेसन होल्डर, रोमॅरियो शेफर्ड, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ind vs wi 2nd t20 match between india vs west indies playing 11 of both teams can be like this avw
Show comments