India vs West Indies 3rd T20I Update: अखेरच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकवणाऱ्या खेळाडूवर क्वचितच टीका केली जाते, परंतु काल रात्री गयानामध्ये भारताच्या कर्णधाराने रोव्हमन पॉवेलला जबरदस्त षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला तेव्हा हार्दिक पांड्याच्या बाबतीत नेमके गणित उलटले. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे आवश्यक होता. यानंतर हार्दिकला सोशल मीडियावर ट्रोल केले गेले, त्याने तरुण खेळाडू तिलक वर्माला अर्धशतक करण्यापासून रोखले असा आरोप केला गेला, जो दुसऱ्या बाजूने ४९ धावांवर नाबाद होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताने हा सामना सात विकेट्सने जिंकली याचे लोकांना काहीही सोयरसुतक नव्हते. याउलट हार्दिक पांड्या महेंद्रसिंग धोनीच्या जवळपासही पोहोचू शकत नाही अशी वक्तव्ये सोशल मीडियावर केली गेली. काही वर्षांपूर्वी धोनीने विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० विश्वचषक सामन्यात विजयी धावा काढण्याची संधी दिली होती.

हार्दिकवर सतत टीका होत असताना, स्टंप माइकने तिलक आणि कर्णधार यांच्यातील एक मनोरंजक चॅट रेकॉर्ड केला आहे. यामध्ये पांड्या वर्माला खेळ संपवण्यास सांगत असल्याचे ऐकले जाऊ शकते. तिलक ३२ चेंडूत ४४ धावांवर फलंदाजी करत होता आणि भारताला २३ चेंडूत १२ धावांची गरज होती तेव्हा हार्दिक म्हणाला, “तेरेको खासकर ये मॅच खतम करना है, रुकना है. गेंदो का फर्क पडता है.” याचाच अर्थ हार्दिकने वर्माला शेवटच्या चेंडूपर्यंत टिकून राहण्याचा आणि विजय साकारण्याचा सल्ला दिला होता.

हेही वाचा: Asian Champions Trophy: हॉकीमध्ये रंगणार आज भारत-पाकिस्तान महामुकाबला! हरल्यास पाक उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर

हे स्पष्ट आहे की तिलक वर्माने विजयी धावा कराव्या अशी हार्दिकची इच्छा होती, परंतु डाव्या हाताच्या फलंदाजाने पुढच्या पाच चेंडूत पाच धावा केल्यावर असे काही घडले की त्याला स्वत:च सांगितलेल्या शब्दापासून दूर जावे लागले. हार्दिक स्वतः १२ चेंडू १२ धावांवर फलंदाजी करत होता आणि त्याच्या टप्प्यात आलेल्या स्लोअर बॉलवर त्याने उत्तुंग षटकार मारला.

हेही वाचा: World Cup 2023: वर्ल्डकपला फक्त ५७ दिवस बाकी; अजूनही भारताला नाही मिळाली परफेक्ट प्लेइंग-११, BCCI कधी करणार संघाची घोषणा?

तिलक वर्माच्या रुपात डावखुऱ्या फलंदाजाचा अभूतपूर्व उदय

अवघ्या तीन सामन्यांमध्ये, तिलक वर्मा चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्याचे इतके कौतुक होत आहे की अनेकजण भारताच्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग होण्यासाठी या २१ वर्षीय तरुणाला पाठिंबा देत आहेत. टीम इंडियाच्या मधली फळीतील अनेक स्लॉटसाठी असंख्य खेळाडूमध्ये संगीत खुर्चीची फेरी बनत असताना, तिलक वर्मा आपली जागा बनवू शकतो असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दीपक हुड्डा नंतर, पहिल्या तीन टी२० मध्ये १३९ धावांसह सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत तिलक दुसऱ्या स्थानावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ind vs wi 3rd t20 match pandya being called selfish and his interaction with tilak verma caught on stump mic avw