Shubman Gill LBW Dismal: आज भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळवला जात आहे. ही मालिका सध्या २-२ अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत हा निर्णायक सामना जिंकणारा संघ टी२० मालिकाही आपल्या नावावर करेल. पहिल्या दोन टी२० मध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत तिसरा आणि चौथा टी२० जिंकला. आता टीम इंडियाची नजर मालिका जिंकण्यावर असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत वि वेस्ट इंडिजच्या चौथ्या सामन्यात शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी रेकॉर्डब्रेक भागीदारी केली होती. दोघांच्या अर्धशतकांमुळे टीम इंडियाला विजय साकारता आला होता. मात्र आजच्या पाचव्या सामन्यात दोघांपैकी एकालाही चांगली धावसंख्या उभारता आली नाही. टीम इंडियाचे कालच्या सामन्यातील दोन्ही स्टार फायनल सामन्यात तंबूत परतले आहेत. यशस्वी अवघ्या ५ धावांवर पहिल्याच षटकात बाद झाला.

तर शुबमन गिल नाबाद असता

भारताला तिसऱ्या षटकात १७ धावांवर दुसरा धक्का बसला. अकील हुसेनने शुबमन गिलला पायचीत केले. त्याला नऊ चेंडूंत केवळ नऊ धावा करता आल्या. शुबमनने डीआरएस रिव्ह्यूचा वापरही केला नाही. त्याचवेळी, शुबमनने डीआरएस वापरला असता तर तो वाचला असता, कारण चेंडू लेग स्टंपला मिस करत असल्याचे रिव्ह्यूमध्ये दिसून आले. वास्तविक शुबमन गिलने रिव्ह्यूसाठी सूर्यकुमार यादवकडे विचारणा केली होती मात्र हे त्याच्यादेखील लक्षात आले नाही. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचा रोष ओढवला आहे.

भारताचे वेस्ट इंडीजसमोर १६६ धावांचे आव्हान

लॉडरहिल, फ्लोरिडा येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या आणि निर्णायक टी२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजसमोर १६६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ९ गडी गमावून १६५ धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक ६१ धावा केल्या. त्याचवेळी वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने चार विकेट्स घेतल्या.

दोन्ही संघांची प्लेईंग ११

वेस्ट इंडिज: ब्रँडन किंग, काइल मेयर्स, शाई होप, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, रोस्टन चेस, रोमॅरियो शेफर्ड, अकील हुसेन, अल्झारी जोसेफ.

भारत: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ind vs wi 5th t20 shubman gill could have not out if review was taken as umpire gave out as lbw and akeal hosein got his wicket avw