Mohammad Siraj, India vs West Indies: डॉमिनिका येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी मोहम्मद सिराजने अप्रतिम झेल घेतला. त्याने ब्लॅकवूडचा अफलातून झेल घेत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्वीट करून सिराजचे कौतुक केले. सिराजच्या या झेलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी वेस्ट इंडिज पूर्णपणे बॅकफूटवर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान ब्लॅकवुड चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ब्लॅकवुडने रवींद्र जडेजाचा फटका खेळला, चेंडू सिराजच्या दिशेने गेला. त्याने हवेत उडी मारून झेल घेतला. सिराजने झेल घेतल्यानंतर जडेजा, इशान आणि सहकाऱ्यांनी त्याच्या पाठीवर थाप दिली. बीसीसीआयनेही सिराजचा फोटो ट्वीट करून त्याचे कौतुक केले.

मोहम्मद सिराजने पकडला अप्रतिम झेल

मोहम्मद सिराज हा विरोधी संघांसाठी घातक वेगवान गोलंदाज तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. त्याने अनेक प्रसंगी आपल्या तत्परतेने लोकांना चकित केले आहे. सिराजने बुधवारीही असाच आश्चर्यकारक पराक्रम केला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने जर्मेन ब्लॅकवुडचा अविश्वसनीय झेल घेतला. त्याने ‘सुपरमॅन’ सारखी डायव्हिंग करत झेल पकडला. हवेत उंच उडत त्याने एका हाताने हा झेल पकडला, हे पाहून प्रेक्षक आणि समालोचकही आश्चर्यचकित झाले. सिराजचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IND vs WI: नाद करायचा नाय! बाप-बेट्याची विकेट घेऊन अश्विनने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

फिरकी अष्टपैलू रवींद्र जडेजाने टाकलेल्या २८व्या षटकात सिराजने हा झेल घेतला. जडेजाने ओव्हरचा शेवटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला, ज्यावर ब्लॅकवूडने मिड-ऑफवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू बाहेर जाईल असे वाटत होते पण सिराजने धावत जाऊन सूर मारत हा झेल घेतला. ब्लॅकवुडने ३४ चेंडूंचा सामना केल्यानंतर १४ धावा केल्या. त्याने २ चौकार मारले. वेस्ट इंडिजच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवल्यानंतर शार्दूल ठाकूरने त्याच्या पहिल्याच षटकात रेयमंड रेइफरची विकेट मिळवली, यष्टींमागे इशान किशनने शानदार झेल घेतला, त्याने २ धावा केल्या. ब्लॅकवूड बाद होताच लंच ब्रेकची घोषणा करण्यात आली होती.

पहिल्या दिवसअखेर सामन्यात काय झाले?

पहिल्या कसोटीचा पहिला दिवस भारताच्या नावावर राहिला. त्यांनी पहिल्या डावात वेस्ट इंडिजला १५० धावांत गुंडाळले. यानंतर, खेळ संपला तेव्हा त्याने टीम इंडियाच्या बिनबाद ८० धावा झाल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मासोबत पदार्पण करणारी यशस्वी जैस्वाल नाबाद आहे. त्याचवेळी अनुभवी रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीत पाच विकेट्स घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३३व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ind vs wi match mohammad siraj caught the catch by jumping in the air you will also appreciate watching the video avw