फुटबॉलविश्वात ‘वॅग्स’ (वाइफ अॅण्ड गर्लफ्रेंड) या विशेषनामाने ओळखली जाणारी संस्कृती आता भारतीय क्रिकेटमध्ये येण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण; सध्या इंग्लडच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना त्यांच्या प्रेयसीला बरोबर आणण्याची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंना दौऱ्यावर येताना आपल्या कुटुंबियांना आणण्याची परवानगी होती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच बीसीसीआयने एखाद्या खेळाडूला स्वत:च्या प्रेयसीला दौऱ्यावर आणण्याची परवानगी दिली आहे. भारताचा फलंदाज विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यावर आपल्यासोबत बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला आणण्यासाठी बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. बीसीसीआयने विराटच्या मागणीला होकार दिल्याने एकीकडे , विराट आणि अनुष्का यांच्या प्रेमसंबंधावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर, दुसरीकडे ‘वॅग्स’ या नवीन संस्कृतीच्या येण्याने भारतीय क्रिकेटला आणखी ग्लॅमर प्राप्त होण्याची चिन्हे दिसत आहेत.
यापूर्वी न्यूझीलंड दौऱ्यावेळी अनुष्का विराटला भेटण्यासाठी ऑकलंडला गेली होती. तिथल्या रस्त्यावर फिरतानाची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली होती. दुसरीकडे, इंग्लंडच्या महिला क्रिकेटची खेळाडू डॅनियल वेटने विराटसमोर ट्विटरवरुन लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर विराटनेही तिची इंग्लंडमध्ये भेट घेतली होती.
इंग्लडच्या दौऱ्यावर विराट-अनुष्का एकत्र; क्रिकेटमध्येही ‘वॅग्स’ संस्कृतीची चाहूल
फुटबॉलविश्वात 'वॅग्स' (वाइफ अॅण्ड गर्लफ्रेंड) या विशेषनामाने ओळखली जाणारी संस्कृती आता भारतीय क्रिकेटमध्ये येण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण; सध्या इंग्लडच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना त्यांच्या प्रेयसीला बरोबर आणण्याची परवानगी देण्यात आली आहे.
![इंग्लडच्या दौऱ्यावर विराट-अनुष्का एकत्र; क्रिकेटमध्येही ‘वॅग्स’ संस्कृतीची चाहूल](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/07/anushka-virat48021.jpg?w=1024)
First published on: 19-07-2014 at 11:45 IST
TOPICSअनुष्का शर्माAnushka Sharmaइंडियन क्रिकेटIndian Cricketक्रीडाSportsबॉलिवूडBollywoodविराट कोहलीVirat Kohli
+ 1 More
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In indias jumbo touring party the g in wags too