Two Important Decisions In ICC Meeting 2023: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्या अंतर्गत आता आयसीसी स्पर्धेत पुरुष आणि महिला संघ जिंकल्यानंतर समान बक्षीस रक्कम दिली जाईल. आतापर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये पुरुष संघाला महिला संघापेक्षा जास्त बक्षीस रक्कम दिली जात होती, पण आता तसे होणार नाही.

क्रिकेटमधील पुरुष आणि महिला संघातील असमानता संपवण्यासाठी आयसीसीने मोठे पाऊल उचलले आहे, जे एक कौतुकास्पद आहे. आयसीसीच्या या मोठ्या पावलाचा क्रिकेटला अधिक फायदा होणार आहे, तर खेळाडूंचा उत्साहही वाढणार आहे.

Champions Trophy 2025 Updates ECB Came in Support of PCB
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘या’ देशाचा पाकिस्तानला पाठिंबा, BCCI शी पंगा घेणं पडू शकतं महागात
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Assembly Elections 2024 What is the type of home voting what are its benefits Nagpur news
गृहमतदान काय प्रकार आहे, त्याचे फायदे काय ?
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Sanskruti More, a visually challenged chess player, satara district
अंधत्वावर मात करून यशशिखर गाठणारी बुद्धीबळपटू संस्कृती मोरे
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या

आयसीसीने बदलला स्लो ओव्हररेटचा नियम –

आयसीसीने आता स्लो ओव्हररेटच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता हा नियम सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चक्रात लागू केला जाईल. त्यामुळे आता जर एखाद्या संघाने निर्धारित वेळेत कमी षटके टाकली, तर त्यानंतर टाकलेल्या सर्व षटकांना मॅच फीच्या पाच टक्के दंड आणि कमाल दंड ५० टक्के इतका मर्यादित असेल.

हेही वाचा – IND vs WI: यशस्वी जैस्वालने झळकावले कसोटी कारकिर्दीतील पहिले अर्धशतक, रोहित शर्मासह साकारली शतकीय भागीदारी

जय शाहांनी ट्विट करुन व्यक्त केला आनंद –

आयसीसीच्या या घोषणेनंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करुन आनंद व्यक्त केला. त्यांनी ट्विटमध्ये लिहले की, “लैंगिक समानता आणि सर्वसमावेशकतेच्या दिशेने उचललेले हे एक मोठे पाऊल असल्याचे जाहीर करताना मला आनंद होत आहे. आता आयसीसी स्पर्धेसाठी पुरूष आणि महिलांच्या सर्व संघांना समान बक्षीस रक्कम दिली जाईल. आपण सगळे मिळून पुढे जाऊया.”

बीसीसीआयचे सचिव जय शाह पुढे म्हणाले की, “हा महत्त्वाचा प्रयत्न साध्य करण्यात मदत केल्याबद्दल मी सहकारी मंडळ सदस्यांचे आभार मानतो. यापुढील काळातही आपण एकत्र काम करू या जेणेकरून क्रिकेटचा खेळ जगभर बहरत राहील.”