ट्वेन्टी-२० विश्वचषकातील आगामी भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट रसिकांना पुन्हा एकदा मौका मौका ही जाहिरात पाहायला मिळणार आहे. २०१५ मधील विश्वचषक स्पर्धेच्यावेळी पाकिस्तानी समर्थक व्यक्तिरेखेची ही जाहिरात क्रीडा जगतात प्रचंड लोकप्रिय ठरली होती. ‘मौका मौका’ ची नवी जाहिरात नुकतीच प्रदर्शित झाली असून यामध्ये पाकिस्तानी समर्थक शाहीद आफ्रिदीला भारतीय संघाला षटकार कसे मारायचे असतात, हे एकदा दाखवूनच दे, असे आवाहन करताना दिसत आहे. मात्र, यावेळी हा पाकिस्तानी समर्थक नेहमीपेक्षा काहीसा हळवा झालेला दिसत आहे.
‘मौका-मौका’.. मराठी तरुणाचा ठेका!
भारत पाकिस्तान यांच्यातील द्वंद्व पाकिस्तानी चाहत्यांसाठी किती भावनिक विषय आहे, याचे प्रत्यंतर या जाहिरातून येते. यापूर्वी विश्वचषकात झालेल्या चार लढतीत भारतीय संघाने प्रत्येकवेळी पाकिस्तानला धुळ चारली आहे. त्यामुळे निदान पाचव्या वेळी तरी भारताला आपण काय आहोत, हे दाखवूनच द्या, असे पाकिस्तानी समर्थक जाहिरातीमध्ये सांगताना दिसतो. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर येत्या १९ मार्चला भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत रंगणार आहे.

Story img Loader