एकदिवसीय विश्वचषक २०२३ सुरू होण्यास आता दोन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. त्याचवेळी, भारत अजूनही योग्य संघ बांधणीच्या प्रयत्नात आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमधून विश्रांती देण्यात आल्यानंतर जी परिस्थिति उद्भवली होती, त्यावरून असे दिसून येते की भारतीय संघाने केलेल्या प्रयोगाने फारसे काही सिद्ध झालेले नाही आणि संघ व्यवस्थापन अजूनही योग्य प्लेइंग इलेव्हनच्या शोधात आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाला, मात्र तिसऱ्या वनडेत शानदार पुनरागमन करत भारतीय संघाला विजय मिळाला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजू सॅमसनने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना अर्धशतक झळकावत मधल्या फळीत चमकदार भूमिका बजावली. मात्र, अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याला वाटते की, सॅमसनला वन डेत वरच्या फळीतील चार खेळाडूंमध्ये स्थान मिळणे सध्या कठीण आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

हेही वाचा: ODI World Cup 2023: ना रोहित ना विराट ‘हा’ खेळाडू टीम इंडियासाठी विश्वचषक जिंकून देऊ शकतो; मोहम्मद कैफचे सूचक विधान

अश्विनने सॅमसनबद्दल काय विधान केले?

अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “भारताने एकदिवसीय मालिकेत अनेक खेळाडूंना संधी दिली होती. त्यापैकी एक खेळाडू म्हणजे संजू सॅमसन. एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. पहिल्या टी२० सामन्यात त्याने १२ चेंडूत १२ धावा केल्या. त्याला मधल्या फळीत धावा करण्याची भूमिका मिळाली. आयपीएलचा विचार केला असता तो तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सॅमसनचा रेकॉर्ड खूप चांगला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्याने उत्कृष्ट सरासरीने फलंदाजी केली आहे आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५० धावा केल्या. मैदानावर येताच त्याने फिरकीचा प्रभाव कमी केला आणि हीच त्याची खासियत आहे.”

सॅमसनच्या संघातील स्थानबद्दल अश्विन म्हणाला, “टीम इंडियाचा विचार केला तर नंबर तीन किंवा चारची जागा अद्याप रिक्त नाही. सॅमसनची क्षमता आणि प्रतिभा आपल्या सर्वांना माहीत आहे. तो कधीही मार्ग बदलून टीम इंडियाला विजयाच्या मार्गावर नेऊ शकतो. तो खूप चांगला खेळाडू आहे आणि आम्ही सर्वजण त्याला शुभेच्छा देतो, परंतु टीम इंडियाच्या बाबतीत सॅमसनकडून ज्या भूमिकेची अपेक्षा करतो ती वेगळी असते. त्याला सध्या पहिल्या चार खेळाडूंमध्ये स्थान नाही. विश्वचषकानंतर किंवा आणखी एक-दोन वर्षांनी त्याला जागा मिळू शकते. मात्र त्यासाठी याला वाट पहावी लागेल आणि परिस्थिती काय आहे ते पाहावे लागेल.”

हेही वाचा: IND vs WI: तिसऱ्या सामन्याआधी वेस्ट इंडीजला मोठा धक्का! निकोलस पूरनला अंपायरशी वाद घालणं पडलं महागात, आयसीसीने केली कारवाई

संजू सॅमसन बॅकअप असू शकतो‘- अश्विन

याबाबतीत बोलताना अश्विन पुढे म्हणाला, “विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. रोहित आणि शुबमन गिल हे सलामीवीर म्हणूनही निश्चित आहेत. श्रेयस अय्यर आणि केएल राहुल देखील तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि तसे होताच ते पुनरागमन देखील करू शकतात. टीम इंडियाला  बॅकअप म्हणून यष्टिरक्षक-फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे जेव्हा केएल किंवा श्रेयसपैकी एकही उपलब्ध नसेल, तेव्हा टीम इंडियाला बॅकअप लागेल. मात्र, सॅमसन आयपीएलमध्ये ती भूमिका साकारत नाहीये. तो फक्त एकदिवसीय सामन्यांमध्ये या भूमिकेत दिसला होता आणि आता त्या भूमिकेत त्याने ५० धावा केल्या होत्या. ही त्याच्यासाठी आणि टीम इंडियासाठी चांगली बातमी आहे. मला वाटते की एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी संजू सॅमसनला बॅकअप म्हणून निश्चितपणे समाविष्ट केले जाईल.  तसेच आणखी एक पर्याय म्हणून तिलक वर्माकडे देखील बघितले जाईल.”

५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे

भारत ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. त्याचबरोबर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरला गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. यावर्षी संपूर्ण एकदिवसीय विश्वचषक भारतात १० मैदानांवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे १० पैकी नऊ ठिकाणी सामने आहेत. सर्व संघ एकमेकांविरुद्ध राऊंड रॉबिन पद्धतीने खेळले जातील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला महमुकाबला खेळवला जाऊ शकतो.

Story img Loader