आयपीएल २०२१ स्पर्धेत पंजाब किंग्सची कामगिरी निराशाजनक राहिली. पंजाबने १४ पैकी ६ सामन्यात विजय, तर ८ सामन्यात पराभव सहन केला आहे. या कामगिरीसह पंजाबचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. असं असलं तरी पंजाबचा कर्णधार केएल राहुल चांगल्याच फॉर्मात आहे. चेन्नई विरुद्धचा सामना सुरु होण्यापूर्वी केएल राहुलकडे ऑरेंज कॅप होती. नाणेफेक जिंकत केएल राहुलने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं.

चेन्नईकडून फलंदाजीसाठी आघाडी आलेल्या ऋतुराजने १२ धावा केल्या आणि केएल राहुलकडून ऑरेंज कॅप खेचून घेतली. त्याच्या एकूण ५३३ धावा झाल्याने त्याला हा मान मिळाला. मात्र हा ४७० या धावसंख्येवर असलेल्या फाफ डुप्लेसिसनं ५५ चेंडूत ७६ धावा केल्या आणि त्याचा एकूण ५४६ धावा झाल्या. काही तासातचं फाफनं ऋतुराजकडून ऑरेंज कॅप घेतली. मात्र ऑरेंज कॅपचं त्याचं स्वप्न काही तासचं राहिलं. चेन्नई विजयासाठी दिलेल्या १३५ धावांचा पाठलाग करताना पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आक्रमक खेळी केली. त्याने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावा केल्या. यात ७ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे. सामना सुरु होण्यापूर्वी केएल राहुलच्या ५२८ धावा होत्या. या सामन्यातील ९८ धावांच्या खेळीमुळे त्याची धावसंख्या ६२६ इतकी झाली आहे.

केएल राहुलने खेळलेल्या १४ सामन्यात एकूण ६२६ धावा केल्या. यात नाबाद ९८ या ही धावसंख्या सर्वोत्तम आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत केएल राहुलने ६ अर्धशतकं झळकावली. त्याने एकूण ४८ चौकार आणि ३० षटकार मारले आहेत.

Story img Loader