Ranji Trophy 2023: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने धुमाकूळ घातला आहे. रणजी ट्रॉफीच्या चालू मोसमात फिटनेस सिद्ध करण्यासाठी आलेला जडेजा सौराष्ट्राचा कर्णधार म्हणून खेळत आहे. तामिळनाडूविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात त्याने आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या सत्रापर्यंत जडेजाने १७.१ षटकांत ५३ धावांत ७ बळी घेतले. त्याने शानदार गोलंदाजी करताना ३ निर्धाव षटकेही टाकली.

जडेजाच्या गोलंदाजीसमोर शाहरुख खान, बाबा इंद्रजित आणि कर्णधार प्रदोष पॉल हे तामिळनाडूचे फलंदाज गारद झाले. जडेजाने शाहरुख खानला २ धावांवर, तर बाबा इंद्रजित २८ धावांवर बोल्ड झाला. जडेजाच्या धारदार गोलंदाजीने कर्णधार प्रदोष पॉलला एलबीडब्ल्यू करून तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर विजय शंकर १०, अजित राम ७, मणिमरन सिद्धार्थ १७ आणि संदीप वॉरियर ४ धावांवर बाद झाल्याने खळबळ उडाली. जडेजाने असे न कळणारे चेंडू टाकले की फलंदाज केवळ अॅक्शन मोडमध्येच राहिले आणि बेल्स उडून गेले.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Rishabh Pant to play Ranji Trophy after 7 years
टीम इंडियाचा ‘हा’ विस्फोटक फलंदाज ७ वर्षांनी रणजी ट्रॉफी खेळणार, जैस्वाल-गिलही देशांतर्गत सामने खेळण्यासाठी सज्ज
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
Rohit Sharma Practice With Mumbai Ranji Trophy Team at Wankhede Stadium
Rohit Sharma: रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत, हिटमॅनने घेतला मोठा निर्णय; मुंबई संघासह…
Rohit Sharma to Play International Cricket Till Champions Trophy Unlikely play England Test Series According to Reports
Rohit Sharma: रोहित शर्मासाठी चॅम्पियन्स ट्रॉफी अखेरची स्पर्धा? ‘या’ दिवशी अखेरचा सामना खेळण्याची शक्यता; मोठी अपडेट आली समोर
Bumrah may lose out on Test captaincy
कसोटी कर्णधारासाठी दीर्घकालीन पर्यायाची गरज; बुमराच्या क्षमतेवरून निवड समितीमध्येच संभ्रम

याआधी पहिल्या डावात स्टार अष्टपैलू खेळाडूने एक विकेट घेतली होती. जडेजाने बाबा इंद्रजितला ६६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. अशा प्रकारे त्याने दोन्ही डावात एकूण ८ विकेट्स घेत धमाका केला. पहिल्या डावात फलंदाजीत तो विशेष काही करू शकला नसला तरी १५ धावा करून बाद झाला. जडेजाने २३ चेंडूत ३ चौकार मारले. बाबा अपराजितने त्याला पायचीत करून तंबूत पाठवले.

हेही वाचा: Indian wrestlers ‘controversy: अखेर सरकार दरबारी घेतली गेली दखल, येत्या स्पर्धेत आंदोलनकर्ते कुस्तीपटू होणार सहभागी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जडेजा फिटनेस सिद्ध करण्यासाठी उतरला आहे. त्याने फिटनेस सिद्ध केल्यास त्याला कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये स्थान मिळेल. तब्बल पाच महिन्यांनंतर जडेजा क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये आशिया चषकादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याला बरे वाटत आहे. या सामन्यात चेतेश्वर पुजारा आणि नियमित कर्णधार जयदेव उनाडकट यांना विश्रांती देण्यात आली आहे.

जडेजा म्हणाला- १०० टक्के फिट असायला हवे

जडेजाने सामन्यापूर्वी सांगितले की, त्याचे पहिले लक्ष्य पूर्णपणे तंदुरुस्त असणे आहे. तो म्हणाला, “मैदानावर परत आल्याने मला बरे वाटत आहे. खुप उत्सुक आशा आहे की ते संघासाठी आणि माझ्यासाठी चांगले होईल. मैदानात उतरणे आणि तंदुरुस्त राहणे हे माझे पहिले प्राधान्य आहे. १०० टक्के फिट.

हेही वाचा: IND vs NZ T20: ‘ऐकाव ते नवलच’ एकाच दिवशी भारत-न्यूझीलंड असे दोन T20 सामने, आश्चर्यकारक वेळापत्रकाने चाहते संभ्रमात

आशिया चषक स्पर्धेत जडेजाला दुखापत झाली होती

गेल्या वर्षी आशिया चषकादरम्यान जडेजाला दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर जडेजा टी२० विश्वचषकही खेळू शकला नाही. ३४ वर्षीय जडेजाने ६० कसोटी सामन्यांमध्ये २५२३ धावा केल्या आहेत आणि २४२ बळीही घेतले आहेत. त्याने १७१ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४४७ धावा करत १८९ विकेट्स घेतल्या आहेत. जडेजाने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ६४ सामन्यात ४५७ धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने ५१ विकेट्स घेतल्या आहेत.

Story img Loader