Yashasvi Jaiswal Double Century : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात भारताने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या डावात पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताची धावसंख्या ३३६/६ अशी होती. यानंतर दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात यशस्वी जैस्वालने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिले द्विशतक झळकावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यशस्वी जैस्वालचे द्विशतक –

यशस्वीने २७८ चेंडूचा सामना करताना ७ षटकार आणि १८ चौकार मदतीने २०२ धावा केल्या. शोएब बशीरच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर यशस्वीने षटकार ठोकला. यानंतर त्याने चौकार मारला. कसोटीत भारतासाठी द्विशतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विनोद कांबळीने वयाच्या २१व्या वर्षी दोन द्विशतके झळकावली होती. त्याचवेळी सुनील गावस्कर यांनी वयाच्या २१व्या वर्षी द्विशतक झळकावले होते. आता यशस्वीने वयाच्या २२ व्या वर्षी ही कामगिरी केली आहे.

भारतीय संघ खूपच मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे यशस्वी जैस्वाल. पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाज दमदार पुनरागमन करतील असे वाटत होते. मात्र जैस्वालचा डाव सोडला तर एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. अशा परिस्थितीत जैस्वालची ही खेळी सर्वात खास आहे. यशस्वीने भारतीय भूमीवर पहिले शतक झळकावले आणि आता त्याच शतकाचे द्विशतकात रूपांतर केले आहे.

हेही वाचा – IND vs ENG 2nd Test : “यशस्वी भव:”, जैस्वालच्या शतकी खेळीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही झाला खूश

पहिल्या दिवसापासून जैस्वालने ज्या प्रकारे संघाची काळजी घेतली आहे. यावरून तो अनुभवी वरिष्ठ खेळाडू असल्याचे दिसते. मात्र यशस्वी युवा खेळाडू असून भारतीय संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. या द्विशतकासह जयस्वालने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. भारताची धावसंख्या ५०० धावांच्या पुढे नेण्याचा जैयस्वाल सर्वतोपरी प्रयत्न करेल. जयस्वाल हे करण्यात यशस्वी ठरल्यास टीम इंडिया मजबूत स्थितीत असेल.