Indian women’s team defeated Bangladesh by seven wickets: ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यातभारतीय महिला संघाने ७ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करताना बांगलादेशच्या महिला संघाला केवळ ११४ धावांत रोखले. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १६.२ षटकांत ३ गडी गमावून ११८ धावा करत लक्ष्य गाठले. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३५ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद ५४ धावांची खेळी केली.

स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली –

११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. संघाला पहिला धक्का शून्यावर बसला. शफाली वर्माला पहिल्याच षटकात मारुफा अख्तरने खाते न उघडता एलबीडब्ल्यू आऊट केले. यानंतर जेमिमा रॉड्रिग्जही काही खास करू शकली नाही आणि ११ धावांवर बाद झाली. स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. मंधानाने ३४ चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने ३८ धावांची खेळी केली. शेवटी हरमन आणि यास्तिका भाटिया यांनी मिळून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. हरमनने १५४ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याचवेळी यास्तिकाने १२ चेंडूत ९ धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

हेही वाचा – ENG vs AUS 3rd Test: “इंग्लंड ५० षटकांच्या सामन्याप्रमाणे…”; धावांचा पाठलाग करताना स्टुअर्ट ब्रॉडचं मोठं वक्तव्य, पाहा VIDEO

बांगलादेशचा डाव ११४ धावांवर आटोपला –

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत ५ गडी गमावून ११४ धावा केल्या. संघाची सुरुवात खराब झाली आणि पाचव्या षटकात मिन्नू मणीने शमिमा सुलतानाला जेमिमाह रॉड्रिग्सकरवी झेलबाद केले. तिला १७ धावा करता आल्या. यानंतर शथी राणीला पूजा वस्त्राकरने क्लीन बोल्ड केले. तिला २२ धावा करता आल्या. कर्णधार निगार सुलताना धावबाद झाली. तिला दोन धावा करता आल्या. शोभना मोस्तारी हिला शफाली वर्माने यष्टिरक्षक यास्तिका भाटियाच्या हाती यष्टिचित केले. तिला २३ धावा करता आल्या. रितू मोनी ११ धावा करून धावबाद झाली. शोर्ना अख्तरने शेवटी काही मोठे शॉट्स खेळले. तिने २८ चेंडूंत दोन षटकारांच्या मदतीने नाबाद २८ धावा केल्या. भारताकडून वस्त्रकार, मिन्नू आणि शफाली यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Story img Loader