IND vs PAK Match In Asia Cup 2023: आशिया चषक २०२३ च्या अंतिम वेळापत्रकाची घोषणा होताच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वत्र चर्चा आहे. जेव्हा क्रिकेटचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात तेव्हा चाहत्यांचे मनोरंजन होईल याची खात्री आहे, परंतु स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच, गदर-2 स्टार सनी देओलने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
खरं तर, बॉलिवूड अभिनेता सनी देओल अलीकडेच भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यासाठी स्टार स्पोर्ट्ससाठी बनवलेल्या एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये दिसला. ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सनी गदर त्याच्या प्रसिद्ध पात्र तारा सिंगच्या पोशाखात दिसत आहे.
व्हिडीओमध्ये सनी देओल म्हणाला, “आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी मी सनी देओल आहे. पण ही तीव्र स्पर्धा सुरू होताच मला तारा सिंग व्हायचे आहे. या सामन्यात बंडखोरी करायची असेल, तर या टीम इंडियासाठी हात वर करा. चिअर अप द मेन इन ब्लू.”
सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर चित्रपट ‘गदर 2’ गेल्या आठवड्यात रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. शुक्रवारी चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार केला. अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट २००१ मध्ये आलेल्या गदर चित्रपटाचा सिक्वेल आहे.गदर-2 हा चित्रपट भारत आणि पाकिस्तान या देशांमधील तणावपूर्ण संबंधांवर आधारित आहे. अशात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कप २०२३ च्या व्हिडिओमध्ये सनी देओल दिसणे आश्चर्यकारक नाही
श्रीलंका आणि पाकिस्तानदव्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील ४ सामने पाकिस्तानमध्ये आणि ९ सामने श्रीलंकेत खेळवले जातील. पाकिस्तानमधील सामने लाहोर आणि मुलतान या शहरांमध्ये होणार आहेत. तसेच श्रीलंकेतील, ९ सामने कँडी आणि कोलंबोमध्ये खेळवले जातील. या स्पर्धेचा पहिला सामना पाकिस्तानातील लाहोर येथे होणार असून अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबो, श्रीलंकेत होणार आहे. यादरम्यान पाकिस्तान संघ घरच्या मैदानावर ग्रुप स्टेजमध्ये फक्त एकच सामना (पहिला सामना) खेळणार आहे. त्याचवेळी २ सप्टेंबरला या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे.