भारत आणि बांगलादेश या संघात दुसरा सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडीयम येथे खेळवला गेला. या सामन्यात यजमान संघाचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात खराब झाली. संघाचे दोन फलंदाज २० धावांच्या आतच तंबूत परतले. तसेेच भारतीय संघाचे वेगवान गोलंदाज बांगलादेशच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरले. बांगलादेशच्या शाकिब अल हसन याला भारताच्या वेगवान गोलंदाजीचा चांगलाच अनुभव आला.
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजांची आक्रमक वृत्ती पाहायला मिळाली. मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक या युवा खेळाडूंनी गोलंदाजीत एकत्र भागीदारी करत सकारात्मक वातावरण तयार केले. बांगलादेशी फलंदाजांवर दडपण कायम ठेवले होते. शॉर्ट आणि बॉडी लाइन चेंडू सतत फेकत राहिले. यादरम्यान सिराजने विरोधी फलंदाज शांतोलाही स्लेज केले. दोघांमध्ये काही संवादही झाला. आवाज स्पष्ट येत नव्हता, पण सर्व काही कॅमेऱ्यात कैद झाले होते.
सिराजने दबाव निर्माण केला
पहिला गडी बाद झाल्यानंतर डावखुरा फलंदाज नजमुल हुसेन शांतो खेळपट्टीवर आला. मोहम्मद सिराजने फलंदाजीला येताच त्याच्यावर हल्ला चढवला. पूर्ण लांबीवर ऑफ स्टंपच्या बाहेर गोलंदाजी करत होता. कव्हर ड्राईव्ह खेळण्यासाठी त्याला वारंवार आमंत्रित करत आहे. आठव्या षटकात दोघे एकमेकांशी भिडले. नजमुल हुसेन शांतोने षटकाच्या पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. यानंतर मोहम्मद सिराजने दोन निर्धाव चेंडू टाकले. चौथ्या चेंडूवर गदारोळ झाला. बाऊन्सर फेकल्यानंतर सिराज पुढे जाऊन काहीतरी बोलला. पुढच्याच चेंडूवर शांतोने चोख प्रत्युत्तर देत चौकार मारला.
सिराजने या सामन्यात आतापर्यंत २ बळी घेतले आहेत. यामध्ये त्याने सलामीवीर अनामूल हक आणि कर्णधार लिटन दासला चालायला लावले. यापूर्वी झालेल्या सामन्यातही त्याने शानदार गोलंदाजी करताना ३ बळी घेतले होते. विशेष म्हणजे उमरान मलिकने नजमुल हुसैन शांतोला आपला शिकार बनवले. उमरानने त्याला धाडसी फटका मारून तंबूत पाठवले.
शाकिब-अल-हसनला बाऊन्सरचा धाक ठेवणाऱ्या उमरान मलिकने १४व्या षटकात शांतोचे काम केले. शांतो पहिल्यांदा उमरान मलिकचा सामना करत होता. गोल विकेटच्या टोकापासून १५१ किमी प्रतितास वेगाने चेंडूचा पूर्ण कोन घेत ऑफ-स्टंप उखडला गेला. नजमुल हुसेन शांतोच्या ३५ चेंडूत २१ धावा.