R Ashwin had an argument with the umpire and James Anderson : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात अश्विनचा अगोदर अंपायरशी आणि नंतर अँडरसनशी किरकोळ वाद झालापहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी अश्विन फलंदाजीला आला. त्याने एकूण १० डूंचा सामना करत पाच धावा केल्या. यानंतर अंपायरने वसाचा खेळ संपल्याची घोषणा केली.

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रविचंद्रन अश्विन खूपच असमाधानी दिसत होता. अश्विनची अंपायर मारायस इरास्मसशी जोरदार चर्चा झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपताच अश्विन काहीतरी तक्रार करण्यासाठी इरास्मसकडे गेला. त्यावेळी तो चिडला होता, तर इंग्लंडचे खेळाडू यशस्वी जैस्वालच्या १७९ धावांच्या खेळीबद्दल अभिनंदन करण्यात व्यस्त होते.

Yuvraj Singh on Father Yograj Singh Says My Father Has Mental Issues Old Video Goes Viral
Yuvraj Singh: “माझ्या वडिलांचं मानसिक आरोग्य…”, योगराज सिंगांच्या धोनी-कपिल देव यांच्यावरील वक्तव्यानंतर युवराजचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Jagdish Tytler indicted after 40 years in anti-Sikh riots case
शीखविरोधी दंगलप्रकरणी जगदीश टायटलर यांच्यावर ४० वर्षांनी दोषारोप… काय होते प्रकरण?
gadchiroli, investigation, IAS officer Shubham Gupta
वादग्रस्त ‘आयएएस’ अधिकारी शुभम गुप्ताच्या अडचणीत वाढ, कार्यकाळातील सर्व प्रकरणांची होणार चौकशी…
Dinesh Karthik apologized to Dhonis fans
Dinesh Karthik : ‘माझ्याकडून मोठी चूक झाली…’, धोनीबाबत झालेल्या ‘त्या’ चुकीबद्दल दिनेश कार्तिकने मागितली माफी
PAV vs BAN 1St Test Shan Masood Controversial Dismissal Out or Not Out After Third Umpire Decision
PAK vs BAN Test: आऊट की नॉट आऊट? तिसऱ्या पंचांच्या निर्णयावरून वाद, ड्रेसिंग रूममध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराने काय केलं? पाहा VIDEO
1973 aruna shanbaug case
कोलकाता अत्याचार प्रकरणामुळे मुंबईतील १९७३ च्या दुर्दैवी घटनेची आठवण; काय होते अरुणा शानबाग प्रकरण?
PM Thailand, Paetongtarn Shinawatra,
विश्लेषण : थायलंडच्या पंतप्रधानपदी ३७ वर्षीय युवा महिला… कोण आहेत पेतोंगतार्न शिनावात्रा? त्यांच्यासमोर कोणती आव्हाने?

अश्विनचा अँडरसन शीही झाला वाद –

भारतीय संघ दुसऱ्या दिवशी ६ विकेट गमावून ३३६ धावांच्या पुढे खेळायला आला, तेव्हा पहिल्या काही क्षणात अश्विन आणि अँडरसन यांच्यात वाद पाहायला मिळाला. तथापि, अँडरसनने या वादाला अश्विनला बाद करुन पूर्णविराम दिला. १०१ व्या षटकात अँडरसनने मधल्या स्टंपसमोर एक चांगल्या लांबीचा चेंडू टाकला, ज्यावर अश्विनने तो सरळ खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू खेळपट्टीवर पडताच उसळला आणि त्याच्या बॅटची बाहेरची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाकडे गेला.

हेही वाचा – SL vs AFG : सदीरा समरविक्रमामध्ये दिसली माहीची झलक! रहमत शाहचा अप्रतिम झेल घेतल्याचा VIDEO होतोय व्हायरल

यानंतर अश्विनने रिव्ह्यू घेतला पण अल्ट्राएजने बॅटचा स्पाईक स्पष्ट दाखवला आणि अश्विनला पॅव्हेलियनमध्ये जावे लागले. दुसऱ्या दिवशी अँडरसनच्या रन अपवर अश्विन थोडा नाखूष होता आणि त्यामुळेच अँडरसनशी त्याचा वाद झाला आणि शुक्रवारीही अश्विन इतर इंग्लिश गोलंदाजांच्या रन अपवर नाखूष होता. दिवसाचा खेळ संपल्यानंतर लगेचच मैदानावरील पंचांशी बराच वेळ चर्चा केली.

हेही वाचा – IND vs NEP : बीड ते ब्लोमफॉन्टीनपर्यंत डंका वाजवणाऱ्या सचिन धसने वडिलांना वाढदिवसानिमित्त दिलं शतकाचं गिफ्ट

यशस्वी जैस्वालने पहिले द्विशतक झळकावले –

या कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, यशस्वी जैस्वालने भारतासाठी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले आणि २९० चेंडूत १९ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने २०९ धावा केल्या. याशिवाय शुबमन गिलने ३४, रजत पाटीदारने ३२, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने २७-२७ धावा केल्या. भारतीय फलंदाजाने कसोटी डावात द्विशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि इतर कोणत्याही खेळाडूला अर्धशतकाचा टप्पा गाठता आलेला नाही.