देशांतर्गत सुरु असणाऱ्या सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचा २०२२-२३ च्या हंगामात मुंबईकडून फलंदाजी करताना चौफेर फटकेबाजी केली. स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतील अ गटात मुंबई आणि आसाम सामना सुरु असून त्यात त्याने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली. पृथ्वी शॉ बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. खराब कामगिरीमुळे त्याला टीकेलाही सामोरे जावे लागले. पण आता पृथ्वीची बॅट गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सय्यद मुश्ताक अली चषक २०२२ च्या सामन्यात त्याने आसामविरुद्ध अवघ्या ४६ चेंडूत शतक झळकावले. डोमेस्टिक जायंट मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वीने या सामन्यात १९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने आसामच्या गोलंदाजांचे वाभाडे काढले. राजकोट येथे झालेल्या या सामन्यात मुंबईला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. सलामीवीर पृथ्वी शॉने आपला दमदार फॉर्म कायम राखत झंझावाती शतक झळकावले. आसामविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने अवघ्या ३ गडी गमावून २३० धावा केल्या. यादरम्यान पृथ्वीने सलामीवीर म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ६१ चेंडूत १३ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १३४ धावा केल्या. या सामन्यात पृथ्वी शॉ ने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळून चाहत्यांची मने जिंकली. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीसमोर आसामच्या गोलंदाजांचा घाम फुटला.

पृथ्वीने पहिल्या आणि पाचव्या षटकात अप्रतिम फलंदाजी केली. त्याने पहिल्या षटकात सलग ५ चौकारांच्या मदतीने २० धावा केल्या. पाचव्या षटकात त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. या षटकात त्याला २६ धावा मिळाल्या. पृथ्वीसोबतच यशस्वी जैस्वालनेही चांगली कामगिरी केली. त्याने ३० चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४२ धावा केल्या. सर्फराज खान १५ धावांवर नाबाद राहिला. तर शिवम दुबेने छोटी आणि दमदार खेळी खेळली. शिवमने ७ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद १७ धावा केल्या.

हेही वाचा :   आशिया चषक २०२३ साठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाऊ शकतो, बीसीसीआयच्या वार्षिक सभेत होणार चर्चा

मुंबईसाठी या सामन्यात मुंबईचे नेतृत्व करत असलेल्या पृथ्वी शॉ याने अमन खान याच्यासह सलामी दिली. मागील दोन सामन्यात वादळी खेळी करणाऱ्या पृथ्वीने या सामन्यातही आपला तोच फॉर्म कायम राखला. कर्णधार मृण्मय दत्ता आसामसाठी सर्वात महागडा ठरला. त्याने फक्त २ षटकात ४१ धावा दिल्या. रोशन आलमने ४ षटकात ४१ धावा देत एक गडी बाद केला. रियान आणि अहमदने १-१ बळी घेतला.