Women’s T20 WC 2023: आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ मध्ये, भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव करत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. आता संघाला १५ फेब्रुवारीला केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर माजी विश्वचषक विजेते वेस्ट इंडिजच्या महिला संघाविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे. याआधी टीम इंडियाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक ट्रॉय कूली यांना आशा आहे की स्मृती मंधाना बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुढील टी२० विश्वचषक सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल. असे झाले तर भारतीय संघ आणखी मजबूत दिसेल.

२६ वर्षीय स्मृती मंधाना बोटाच्या दुखापतीमुळे भारताच्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या गटातील सामन्याला मुकली होती. या सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवला. मात्र, आता मंधाना फिट दिसत आहे. भारताचा स्टार सलामीवीर न्यूलँड्स येथील सामन्यासाठी पूर्व-सामन्याच्या प्रशिक्षण सत्रानंतर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
INDW vs AUSW Arundhati Reddy Dismissed Top 4 Batters of Australia Top Order Becomes
INDW vs AUSW: अरूंधती रेड्डीचा ऐतिहासिक पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी पहिली भारतीय गोलंदाज
India Women Vs Australia Women Cricket 2nd ODI India loses against Australia  sport news
भारतीय महिला संघाची पुन्हा हाराकिरी ; दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सर्वोच्च धावसंख्येसह सरशी
IND vs AUS 2nd Test Day 2 Highlights Only Twice Any Team Win Day Night Test After Conceding First Innings Lead
IND vs AUS: ॲडलेड कसोटीत भारताची स्थिती बिकट, दुसऱ्या दिवशी निम्मा संघ तंबूत; ‘हा’ रेकॉर्ड पाहता पराभव टाळणं कठीण
IND vs AUS: Adelaide floodlight failure forces stoppage in play twice
IND vs AUS: ऑस्ट्रेलियात लोडशेडिंग! अ‍ॅडलेडमध्ये २ वेळा बंद झाले फ्लडलाईट्स, हर्षित राणा वैतागला तर चाहत्यांनी… पाहा VIDEO
India Beat Sri Lanka by 7 Wickets in Semifinal and Enters Final of U19 Asia Cup
IND U19 vs SL U19: भारताचा U19 संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत, १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीने २४ चेंडूत केलं अर्धशतक; अंतिम फेरीत कोणाविरूद्ध खेळणार?

“ती खूप मेहनत घेत आहे आणि प्रशिक्षणानंतर त्याचे मूल्यांकन केले जाईल. तिने जे काही करायचे ते केले आणि आम्हाला खात्री आहे की ती चांगली कामगिरी करेल,” कूली म्हणाली. जेमिमाह रॉड्रिग्सने मंधानाच्या अनुपस्थितीत पाकिस्तानविरुद्ध ३८ चेंडूत नाबाद ५३ धावा करून भारताला एक षटक शिल्लक असताना विजय मिळवून दिला. ती तिसऱ्या क्रमांकावर आली. वेस्ट इंडिजच्या महिला संघाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि त्यांना इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. आता भारताविरुद्धचा हा सामना त्यांना जिंकता आला नाही, तर उपांत्य फेरी गाठणे तिच्यासाठी खूप कठीण जाईल.

भारतीय महिला संघाने भलेही आपला पहिला सामना नेत्रदीपक पद्धतीने जिंकला असेल, पण संघाच्या शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी निश्चितच चिंतेची बाब ठरली आहे. त्याचबरोबर गेल्या सामन्यात गोलंदाजांना केवळ ४ विकेट्स घेता आल्या होत्या. अशा परिस्थितीत या सामन्यात सुधारणा न झाल्यास संघ अडचणीत सापडू शकतो. फलंदाजीत, जेमिमाह रॉड्रिग्स आणि ऋचा घोष यांच्या शानदार सामना जिंकणाऱ्या खेळीमुळे संघाची मधली फळी खूपच मजबूत दिसत आहे. दुसरीकडे, पहिल्या सामन्यातील विंडीज महिला संघाची कामगिरी पाहिली तर कर्णधार हेली मॅथ्यूज आणि कॅम्पबेल यांनी फलंदाजीची जबाबदारी निश्चितपणे घेतली, परंतु इतर खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने निराशा केली.

गोलंदाजी प्रशिक्षक कुली यांनी दीप्ती शर्माबद्दल सांगितले की, “ती पाकिस्तानविरुद्ध थोडी महागडी ठरली, पण तिने कठीण षटके टाकली. पॉवरप्लेमध्ये तीन षटके टाकली आणि एक डेथ षटकामध्ये, जेव्हा तीन क्षेत्ररक्षक २५-यार्ड सर्कलच्या बाहेर होते. आम्हाला माहित आहे की ही एक दबावाची परिस्थिती होती, परंतु ही षटके टाकण्यासाठी तिच्यापेक्षा चांगली कोणीच असू शकत नाही.”

हेही वाचा: Indian Team ICC Rankings: ऐतिहासिक कामगिरी! वर्ल्ड क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा जलवा, कसोटीसह तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-१

पीच रिपोर्ट

केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल सांगायचे तर, येथे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये मदत घेताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या खेळपट्टीवर टी२० फॉरमॅटमध्ये पहिल्या डावात १५०च्या आसपास धावसंख्या दिसून आली.

संभाव्य संघ

भारत: यास्तिका भाटिया, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग, स्मृती मंधाना, शिखा पांडे, देविका वैद्य, अंजली सरवणी

हेही वाचा: R Ashwin: “माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझ्या बायकोला…” ऑस्ट्रेलियन फिरकीपटूचे मजेशीर विधान

वेस्ट इंडिज: हेली मॅथ्यूज (कर्णधार), स्टॅफनी टेलर, शेमेन कॅम्पबेले, शबिका गजनाबी, चिनेल हेन्री, चेडियन नेशन, रशादा विल्यम्स (यष्टीरक्षक), झैदा जेम्स, ऍफी फ्लेचर, शमिलिया कोनेल, शकेरा सेलमन, करिश्मा रामहारक, आलिया अलने त्रिशन होल्डर, जेनाबा जोसेफ

Story img Loader