आयपीएलच्या धर्तीवर आता सर्वच खेळांमध्ये लीग आधारित स्पर्धाना सुरुवात झाली आहे. टेनिसपटूंना प्रसिद्धीबरोबरच आर्थिक सधनता मिळवून देऊ शकेल अशा महाराष्ट्र टेनिस लीगचा पहिला हंगाम १४ जानेवारीपासून पुण्यात सुरू होत आहे. या लीगमधील मुंबई ब्लास्टर्स संघाच्या जर्सीचे अनावरण संघाचे कर्णधार-सल्लागार आणि ज्येष्ठ टेनिसपटू आनंद अमृतराज यांच्या हस्ते झाले.
यावेळी संघातील खेळाडूही जाहीर करण्यात आले. चंदीगढचा सनम सिंग, मुंबईचा पुरव राजा, हैदराबादचा कझा विनायक शर्मा, तामिळनाडूचा अजई सेल्वाराज यांच्यासह पुणेकर ऋतुजा भोसले आणि गुजरातची इटी मेहता या संघात असणार आहेत. संदीप कीर्तने या संघाचे प्रशिक्षक असतील. याआधी मी अमेरिकेतील लीगपद्धतीच्या स्पर्धेत प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. या स्पर्धेतही संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणार असल्याचे आनंद अमृतराज यांनी सांगितले.
वैयक्तिक विकासाकरता लीग फायदेशीर-ऋतुजा भोसले
मी आतापर्यंत एकटीच खेळली आहे. पण महाराष्ट्र टेनिस लीगच्या निमित्ताने मला सांघिक स्वरूपात खेळावे लागणार आहे. हा माझ्यासाठी वेगळा अनुभव असणार आहे. आनंद सरांचे मार्गदर्शन हा माझ्यादृष्टीने वैयक्तिक विकासाचा मुद्दा ठरणार आहे. टेनिसबाबतचे अनेक बारकावे त्यांच्याकडून शिकण्याचा माझा प्रयत्न असेल असे ऋतुजाने सांगितले. या लीगमुळे आर्थिकदृष्टय़ाही मला हातभार लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा