वृत्तसंस्था, पॅरिस : कतार येथे होणाऱ्या आगामी ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेसाठी गतविजेत्या फ्रान्सने २५ जणांचा संघ जाहीर केला. या संघात बॅलन डी’ओर विजेता करीम बेन्झिमाचा समावेश करण्यात आला आहे. बेन्झिमाला दुखापत झाली होती. मात्र, तो स्पर्धेपूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होणे अपेक्षित आहे. तसेच विल्यम सलिबा आणि युसूफ फोफाना या युवकांनाही संघात स्थान मिळाले आहे.

यंदाच्या स्पर्धेसाठी फ्रान्सचा ऑस्ट्रेलिया, टय़ुनिशिया आणि डेन्मार्कसह ड-गटात समावेश आहे. फ्रान्सचा संघ २३ नोव्हेंबरला कतारमधील अल वक्राह क्रीडा संकुल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात करेल. ऑरेलिएन टिचोयुमेनी आणि एडुआडरे कामाविंगासारखे मध्यरक्षक त्यांचा पहिला विश्वचषक खेळणार आहेत, तर पॉल पोग्बा आणि एन्गोलो कांटे या प्रमुख खेळाडूंना दुखापतींमुळे या स्पर्धेला मुकावे लागणार आहे. २०१८च्या विश्वचषक विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणारा पोग्बा गुडघ्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.

संघ

  • गोलरक्षक : ह्यूगो लॉरिस (कर्णधार), स्टीव्ह मंदांडा, अल्फोन्स अरेओला
  • बचावपटू : लुकास हर्नाडेझ, थिओ हर्नाडेझ, प्रेस्नेल किम्पेम्बे, इब्राहिमा कोनाटे, ज्युल्स कुंडे, बेंजामिन पावार्ड, विल्यम सलिबा, राफेल वरान, डेयोट उपामेकानो
  • मध्यरक्षक : एडुआडरे कामाविंगा, युसूफ फोफाना, मॅटेओ गुएन्डोझी, अ‍ॅड्रिएन रॅबिओ, ऑरेलियन टिचोयुमेनी, जॉर्डन वेरेटूट
  • आघाडीपटू : करीम बेन्झिमा, किंग्सले कोमन, ओस्माने डेम्बेले, ऑलिव्हियर जिरूड, अँटोइन ग्रीझमन, किलियान एम्बापे, क्रिस्टोफर एनकुंकू

Story img Loader