INDA vs AUSA David Warner on India A Ball Tempering: ऑस्ट्रेलियामधून सुरू असलेल्या भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए सामन्यात भारतीय संघावर चेंडू बदलल्याचा बॉल टेम्परिंगचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणाबाबत वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला एक सल्ला दिला आहे. मॅके येथे रविवारी (३ नोव्हेंबर) चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी पंचांनी चेंडू बदलला. यावरून यष्टीरक्षक इशान किशन आणि मैदानावरील पंच यांच्यात जोरदार वादावादी झाली. पंचांनी त्यांना तक्रार करण्याचा इशारा दिला. ऑस्ट्रेलिया अ संघाने हा सामना ७ विकेटने जिंकला.
ऑस्ट्रेलिया क्रिकेटने काही तासांनंतर एक निवेदन जारी केले आणि भारत अ संघाची बॉल टॅम्परिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. तसेच इशान किशनवर कोणतीही कारवाई करणार नसल्याचे सांगितले. पण आता हे सर्व शांत झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नरने पुन्हा एकदा हा वाद उकरून काढला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ लवकरच ऑस्ट्रेलियात येणार आहे, असे डेव्हिड वॉर्नरने म्हटले आहे. अशा स्थितीत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे. सिडनीमध्ये पत्रकारांशी बोलताना वॉर्नर म्हणाला, “माझ्या मते अंतिम निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे आहे, बरोबर? या उन्हाळ्यात भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येत आहे हे लक्षात घेऊन त्यांनी शक्य तितक्या लवकर हे प्रकरण दाबले आहे. पण जर पंचांना काही घडले आहे असे वाटत असेल तर मला खात्री आहे की त्याचा पाठपुरावा केला जाईल.”
पुढे वॉर्नर म्हणाला, “मला वाटते की पंच किंवा सामनाधिकारी यांनी समोर येऊन या प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. मॅच रेफरीने जे पंच आहेत त्यांच्याशी येऊन बोललं पाहिजे आणि जर ते पंचांच्या निर्णयावर ठाम असतील तर तुम्हाला त्यासाठी उभे राहावे लागेल. मला वाटते कदाचित CA ला स्पष्ट उत्तर देणे आवश्यक आहे.”
D