IND A vs AUS A Indian team accused of ball tampering : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लवकरच पाच सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणी आहे. त्याआधी भारत अ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील पहिला अनधिकृत कसोटी सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघाने सामन्याच्या चौथ्या दिवशी भारत अ ७ विकेट्सनी धूळ चारत दणदणीत विजय मिळवला. हा सामना संपेपर्यंत नव्या वादात सापडला आहे. या सामन्यादरम्यान पंचांनी भारत अ संघावर चेंडूशी छेडछाड (बॉल टॅम्परिंग) केल्याचा आरोप केला आहे, ज्यामुळे नवा वाद पेटला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे प्रकरण?

ईएसपीएनक्रिकइंफोनुसार, चौथ्या दिवसाचा पहिला चेंडू टाकण्यापूर्वी भारतीय खेळाडू आणि पंच शॉन क्रेग यांच्यात जोरदार वाद झाला, ज्यामध्ये यष्टीरक्षक इशान किशनने चेंडू बदलण्याच्या निर्णयाला ‘मूर्खपणा’ म्हटल्याने अडचणीत येण्याची शक्यता आहे. फॉक्स क्रिकेटवर स्टंप मायक्रोफोनद्वारे रेकॉर्ड केलेल्या ऑडिओमध्ये चेंडू का बदलला हे स्पष्ट करताना, क्रेग म्हणाले, ‘पहिल्या चेंडूवर ओरखडे दिसून आले आहेत, त्यामुळे आम्ही चेंडू बदलला आहे आणि यावर आणखी चर्चा होणार नाही, चला सामना सुरु करु.’

इशान आणि पंचात वाद –

भारतीय खेळाडूंना हे आवडले नाही आणि त्यांनी पंचाकडे असहमती व्यक्त केली. यावर क्रेग म्हणाले, ‘आता चर्चा नको, सामना सुरू करा, यावर चर्चा करायची नाही.’ यानंतर इशान किशन पंचांच्या निर्णयावर संतापला. तो म्हणाला, ‘हा अतिशय मूर्खपणाचा निर्णय आहे.’ यावर क्रेग म्हणाले, ‘तुमच्या या असहमतीसाठी तक्रारे केली जाईल. हे वर्तन ठीक नाही. तुमच्या (संघाच्या) कृतीमुळेच आम्ही चेंडू बदलला.’

हेही वाचा – Ravichandran Ashwin : अश्विनने मागे धावत जाऊन घेतला कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कॅच, VIDEO होतोय व्हायरल

u

विशेष म्हणजे, नियम 41.3.4 मध्ये सांगितल्याप्रमाणे, जेव्हा अंपायर चेंडू “अयोग्यरित्या बदलला गेला” असे मानतात तेव्हा ऑस्ट्रेलिया अ संघाला पाच पेनल्टी धावा दिल्या गेल्या नाहीत. मात्र, याचे कोणतेही पुरावे नसताना मग अशा पद्धतीने चेंडू का बदलण्यात आला, हा प्रश्न कायम आहे. नियमांनुसार, जर पंचांना असे वाटत असेल की कोणत्याही संघाच्या सदस्याने चेंडूशी छेडछाड केली आहे, तर त्यांनी विरोधी पक्षाच्या कर्णधाराला चेंडू बदलायचा आहे का? हे विचारले पाहिजे. आवश्यक असल्यास, फलंदाजीच्या बाबतीत खेळपट्टीवरील फलंदाज त्याच्या कर्णधाराच्या जागी हा निर्णय घेऊ शकतो.

हेही वाचा – IND vs NZ : भारताच्या फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, टीम इंडियाला विजयासाठी मिळाले १४७ धावांचे लक्ष्य

भारत अ संघाने गमावला सामना –

ऑस्ट्रेलिया अ संघाने हा सामना ७ विकेट्सने जिंकला. संघाने चौथ्या डावात २२६ धावा करून सामना जिंकला. भारत अ संघाने पहिल्या डावात १०७ धावा केल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाचा डाव १९५ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात साई सुदर्शनच्या शतकाच्या जोरावर भारत अ संघाने ३१२ धावा केल्या. साईने १०३ तर देवदत्त पडिक्कलने ८८ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind a vs aus a ishan kishan in trouble as india a team accused of ball tampering after at center of ball change controversy vbm