ACC Men’s Emerging Asia Cup 2023,India A vs Pakistan A: एसीसी पुरुष उदयोन्मुख आशिया चषक २०२३ चा सामना आज भारत अ आणि पाकिस्तान संघात खेळला जात आहे. हा सामना कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानचा डाव राजवर्धन आणि मानव सुथारनच्या धारदार गोलंदाजीसमोर २०५ धावांत गारद झाला. या दरम्यान भारतीय संघाचा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या विकेटकीपिंग ग्लोव्हजची चर्चा होत आहे.

भारत अ संघाचा वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगेरगेकरने सुरुवातीलाच दोन बळी घेत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरला. दोन्ही फलंदाजांनी त्यांचे झेल भारतीय यष्टीरक्षक ध्रुव जुरेलकडे सोपवले. या सामन्यात जुरेल खास विकेटकीपिंग ग्लोव्हज घालून विकेटकीपिंग करण्यासाठी उतरला होता.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sachin Tendulkar Cryptic post about Steve Bucknor
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांच्या वाईट आठवणी झाल्या ताज्या, ‘हा’ अनुभवी अंपायर पुन्हा आला चर्चेत
Tilak Verma scores centuries in two consecutive T20 matches in South Africa
Tilak Varma : ‘…मी कल्पनाही केली नव्हती’, विक्रमी शतकानंतर तिलक वर्माने देवासह ‘या’ खेळाडूचे मानले आभार
Tilak Varma Statement on Maiden T20I Century Flying Kiss Celebration He Said It is For Suryakumar Yadav Gives credit to him IND vs SA
IND vs SA: तिलक वर्माने शतकानंतर कोणाला फ्लाईंग किस दिला? सामन्यानंतर स्वत:च सांगितलं…
Tilak Verma becomes 2nd youngest player to score a T20I century for India
Tilak Verma : तिलक वर्माने वादळी शतक झळकावत घडवला इतिहास, भारतासाठी ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद

ध्रुव जुरेलला हे विकेटकीपिंग ग्लोव्हज इंग्लंडचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरकडून मिळाले आहेत. जुरेल आणि बटलर दोघेही आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून एकत्र खेळतात. खुद्द राजस्थान रॉयल्सने जुरेलचे विकेटकीपिंग ग्लोव्हज घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे तेच विकेटकीपिंग ग्लोव्हज आहेत, जे बटलरने जुरेलला भेट दिले होते. विकेटकीपिंग ग्लोव्हजवरही जोस बटलरचे नाव लिहिले आहे.

सामन्याबद्दल बोलायचे तर, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान अ संघाने ४८ षटकांत सर्वबाद २०५ धावा केल्या आहेत. भारताकडून गोलंदाजीत राजवर्धन हंगरगेकरने ५ तर मानव सुथारने ३ बळी घेतले. पाकिस्तानच्या फलंदाजीत कासिम अक्रमने ४८ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्यामुळे आता भारतीय संघाला २०६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

हेही वाचा – Asia Cup 2023 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! ‘या’ दिवशी होणार भारत आणि पाकिस्तानचा सामना

भारत अ संघाची चांगली सुरुवात –

भारत अ च्या फलंदाजांनी पाकिस्तान अ विरुद्ध चांगली सुरुवात केली आहे. २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साई सुदर्शन आणि अभिषेक शर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी तीन षटकांत २३ धावांची भागीदारी केली. सलामीवीर अभिषेक १२ आणि सुदर्शन ११ धावांवर नाबाद आहेत.