India tour of South Africa 2023-24: भारतीय क्रिकेट संघ प्रशिक्षक राहुल द्रविडबरोबर दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आहे. द्रविडने टीम इंडियाचा पदभार स्वीकारला आहे. टीम इंडिया बुधवारी सकाळी बंगळुरू विमानतळावरून दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाली. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होईल, त्यातील पहिला सामना रविवार, १० डिसेंबर रोजी खेळवला जाईल.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होणार आहे. पहिला सामना १० डिसेंबरला डरबनमध्ये खेळवला जाईल. यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि शेवटी दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. कर्णधार रोहित शर्माबरोबर विराट कोहलीही कसोटीत पुनरागमन करेन, त्याने वन डे आणि टी-२० मालिकेतून ब्रेक घेतला आहे. सूर्यकुमार यादव टी-२० मध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल आणि के.एल. राहुल वन डेमध्ये नेतृत्व करेल.
एकदिवसीय विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला होता, जो वाढवण्यात आला होता, जरी तारीख अद्याप जाहीर झाली नसली तरी जूनमध्ये होणाऱ्या विश्वचषकापर्यंत राहुल द्रविड प्रशिक्षकपदावर राहणार असल्याचे मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेत व्हीव्हीएस लक्ष्मण प्रशिक्षक होते. पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर द्रविडची ही पहिलीच मालिका आहे.
दीपक चाहर टी-२० मालिकेतून बाहेर होऊ शकतो
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मर्यादित षटकांच्या मालिकेत सहभागी असलेला वेगवान गोलंदाज दीपक चहरला टी-२० मालिका खेळणे कठीण जात आहे. वडिलांची तब्येत खराब असल्याने आणि रुग्णालयात दाखल असल्याने तो टीम इंडियासोबत जाऊ शकला नाही. दीपक चहर यांनीही सांगितले आहे की तो पूर्णपणे बरा होईपर्यंत वडिलांना सोडणार नाही.
हेही वाचा: IPL 2024: कोण आहे मल्लिका सागर? आयपीएल लिलावात साकारणार लिलावकर्त्याची भूमिका, जाणून घ्या
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ (टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी)
टी-२०साठी भारतीय संघ: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (अष्टपैलू), वाशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
एकदिवसीयसाठी भारतीय संघ २०२३: ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंग, दीपक चाहर.
हेही वाचा: दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी संजू सॅमसनने केली दावेदारी पक्की, विजय हजारे ट्रॉफीत झळकावले शानदार शतक
कसोटीसाठी भारतीय संघ २०२३: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर , मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा.
भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
तारीख | सामना | स्थळ |
१० डिसेंबर | पहिला टी-२० सामना | डरबन |
१२ डिसेंबर | दुसरा टी-२० सामना | जीक्यूबेरा |
१४ डिसेंबर | तिसरा टी-२० सामना | जोहान्सबर्ग |
१७ डिसेंबर | पहिला एकदिवसीय सामना | जोहान्सबर्ग |
१९ डिसेंबर | दुसरा एकदिवसीय सामना | जीक्यूबेरा |
२१ डिसेंबर | तिसरा एकदिवसीय सामना | पार्ल |
२६-३० डिसेंबर | पहिली कसोटी | सेंचुरियन |
३-७ जानेवारी (२०२४) | दुसरी कसोटी | केपटाऊन |