IND U19 vs PAK U19 Match Updates in Marathi: अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होत आहे. या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार साद बेगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २८१ धावांचा डोंगर उभारला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनीच संघाला जबरदस्त सुरूवात करून दिली. पाकिस्तानी सलामीवीराच्या जोडीपुढे भारतीय खेळाडू विकेटच्या शोधात होते. या दोघांनी मिळून १०० अधिक धावांची भागीदारी रचली. तर सलामीवीर शाहजेब खान याने शतक झळकावत इतिहास घडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शाहजेब खानने बेधडक फलंदाजी करत संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके मारले. डावाच्या सुरुवातीला क्रीजवर स्थिरावण्यास त्याने थोडा वेळ घेतला. यानंतर लयीत येताच त्याने धावा काढण्यास सुरुवात केली. त्याने १०७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि अंडर–१० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानकडून शतक झळकावणारा तो ७वा फलंदाज ठरला.

हेही वाचा – IND vs PAK: आजच भारत-पाकिस्तान मुकाबला कुठे लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या वेळ आणि चॅनेल

शाहजेब खानने अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध आतापर्यंत १० षटकार आणि ५ चौकारांसह १४७ चेंडूत १५९ धावांची उत्कृष्ट खेळी केली. अंडर-१९ क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानकडून सर्वात मोठी खेळी खेळणारा तो फलंदाज आहे. त्याने सामी अलसमचा विक्रम मोडला आहे. सामी अस्लमने यापूर्वी अंडर-१९ क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध १३४ धावांची इनिंग खेळली होती.

हेही वाचा – VIDEO: मुंबईचा राजा रोहित शर्मा! ऑस्ट्रेलियात चाहत्यांकडून घोषणाबाजी, हिटमॅनच्या प्रतिक्रियेनं वेधलं लक्ष

U19 मध्ये भारताविरुद्ध सर्वात मोठी खेळी खेळणारे पाकिस्तानी फलंदाज:
शाहजेब खान-१५६ धावा
सामी अलसम- १३४ धावा
सामी अलसम- १२१ धावा
रोहिल नाझीर- ११७ धावा
झाहिद फजल – १०९ धावा

पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी

शाहजेब आणि उस्मान खान यांच्यात पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी झाली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना आव्हान देत चांगली फटकेबाजी केली. उस्मानने ६० धावांची खेळी केली. त्याने शाहजेबला चांगली साथ दिली आणि पाकिस्तानला चांगल्या स्थितीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. उस्मान खानच्या रूपाने पाकिस्तानला पहिला धक्का बसला. त्याने ९४ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ६० धावांची खेळी खेळली. त्याचवेळी आयुष म्हात्रेने टीम इंडियाला हे यश मिळवून दिले, ज्याची टीमला सर्वाधिक गरज होती.