IND vs AFG 1st T20 Schedule, Live Streaming, Date, Pitch Report, Weather : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बुधवार, ११ जानेवारीपासून ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या वर्षाच्या मध्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२४ पूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-२० मालिका आहे. भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली १४ महिन्यांनंतर टी-२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहेत.

टी-२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत भारताचा इंग्लंडकडून पराभव झाल्यापासून हे दोन्ही खेळाडू टी-२० क्रिकेटपासून दूर आहेत. पहिला टी-२० सामना कधी आणि कुठे पहायचा ते जाणून घ्या.

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Naveen Ul Haq Bowls a 13 Ball Over Including 6 Wides 1 No ball in AFG vs ZIM 1st T20I Match Watch Video
ZIM vs AFG: नवीन उल हकने टाकलं १३ चेंडूंचं षटक, ठरला संघाच्या पराभवाचं कारण, वाईड बॉलचा भडिमार; पाहा VIDEO
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
Nitish Rana and Ayush Badoni Engage in Heated Exchange in Delhi vs Uttar Pradesh SMAT 2024 Video
SMAT 2024: लाईव्ह सामन्यात भिडले भारताचे दोन खेळाडू, नितीश राणा युवा खेळाडूवर संतापला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Lakhat Ek Aamcha Dada
Video : “…तसा सूर्या तुमचा जावई”, तुळजाने केली डॅडींकडे ‘ही’ मागणी; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो
आशयाला प्रयोगशीलतेची जोड‘; लोकसत्ता लोकांकिका’ मुंबई विभागीय प्राथमिक फेरीत विषयांचे वैविध्य
Subhash Ghai is undergoing treatment at Lilavati Hospital in Mumbai.
Subhash Ghai : सुप्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांची प्रकृती बिघडली, मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल

लाइव्ह स्ट्रीमिंग मोफत कुछे पाहता येणर?

स्पोर्ट्स १८, स्पोर्ट्स १८ एचडी या अधिकृत प्रसारण चॅनेलवर तुम्ही भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिल्या टी-२० सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. तुम्ही टीव्हीवर इंग्रजी, हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकू शकता. तसेच तुम्ही हा सामना ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट पाहू शकता. मोबाईल आणि डेस्कटॉप दोन्हीवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग होणार आहे. त्याचबरोबर जिओ सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर टी-२० सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग मोफत असेल.

हेही वाचा – Virender Singh : “माझा गुन्हा एवढाच आहे की मी…”, पुरस्कार न मिळाल्याने मूक-बधिर पैलवानाने शेअर केली भावनिक पोस्ट

कितीला सुरु होणार सामना?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-२० सामना ११ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथे होणार आहे. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. तत्पूर्वी नाणेफेक संध्याकाळी ६.२० वाजता होईल.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान पहिला टी-२० सामन्यातील हवामान अंदाज –

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-२०च्या दिवशी संध्याकाळी येथे खूप थंडी असेल. दिवसाचे कमाल तापमान १४ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील. या सामन्यात पावसाची शक्यता नाही. पूर्ण ४० षटकांचा सामना अपेक्षित आहे.

हेही वाचा – शिखर धवनने सांगितले लोकांचे लग्न न करण्यामागचे मजेदार कारण, VIDEO होतोय व्हायरल

पहिल्या टी-२० सामन्याच्या खेळपट्टीचा अहवाल –

पीसीए स्टेडियम हे फलंदाजांचे नंदनवन मानले जाते. मात्र, सुरुवातीच्या काळात वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीचे मदत होते. फिरकीपटूंनाही मदत मिळते. खेळपट्टीवर चांगली उसळी असल्याने चेंडू बॅटवर सहज येतो. तसेच मैदानाचे आऊटफिल्डही वेगवान आहे. या सामन्यात दव महत्वाची भूमिका बजावू शकते. मोहालीत खेळल्या गेलेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने २०९ धावांचे आव्हान ठेवले होते. पहिल्या डावातील सरासरी १८३ धावसंख्या देखील मोहालीची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे सूचित करते.

टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

हेही वाचा – Praveen Kumar : “ते खूप जास्त करायचे…”, ‘बॉल टॅम्परिंग’बाबत माजी भारतीय गोलंदाजाचे वक्तव्य

टी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ –

इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इक्रम अलीखिल, हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद काबी, करीम जन्नत, अजमतुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीबुर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीनुल हक, नूर अहमद, नूर अहमद, कैस अहमद.

Story img Loader