हैदराबादमध्ये रविवारी पार पडलेल्या ऑस्ट्रेलियावरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यामध्ये भारताने सहा गडी आणि एक चेंडू राखून विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी फरकाने जिंकली. या सामन्यात ३६ चेंडूंत ६९ धावा करणारा सूर्यकुमार यादव आणि ४८ चेंडूंत ६३ विराट कोहलीने झंझावाती अर्धशतकांचा नजराणा सादर केला. या सामन्यातील विजयी फटका हार्दिक पंड्याने लगावला. या विजयी फटक्यानंतर भारतीय डग आऊटमध्ये बसलेल्या विराट आणि कर्णधार रोहित शर्माची प्रतिक्रिया सध्या व्हायरल होताना दिसत आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये वाद असल्याच्या चर्चा अनेकदा रंगताना दिसतात. त्याच पार्श्वभूमीवर या दोघांमधील खास नातं दाखवणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नक्की पाहा >> Video: बॉल लागण्याआधीच कार्तिकच्या हाताने स्टंम्प उडाला तरी मॅक्सवेल धावबाद कारण…; पाहा ‘तो’ नाट्यमय क्षण
झालं असं की, शेवटच्या षटकामध्ये ११ धावांची गरज असताना कोहली झेलबाद झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकने एक धाव काढून क्रिझवर सेट असलेल्या हार्दिक पंड्याला स्ट्राइक दिली. पंड्या शेवटच्या षटकात खेळेला पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर पंड्याने एक खणखणीत षटकार लगावला. दोन चेंडूंमध्ये चार धावा असं गणित असताना पंड्याच्या बॅटला कट लागून चेंडू विकेटकिपर आणि स्लीपच्या फिल्डरमधील जागेतून चौकार गेला अन् भारताने सामन्याबरोबरच मालिकाही आपल्या नावावर केली.
नक्की वाचा >> Ind vs Aus: भारतीय गोलंदाजांना कुटणाऱ्या ग्रीनबद्दल जाफरचं मोठं भाकित; Meme शेअर करत म्हणाला, “IPL संघ…”
पंड्याने मारलेला शेवटचा फटका चौकार गेल्यानंतरची रोहित आणि विराटची भारतीय डगआऊटमधील प्रतिक्रिया फारच बोलकी होती. दोघेही सामना रंजक स्थितीत पोहचलेला असताना डगआऊटच्या पायऱ्यांवर बसून तो पाहत होते. विराटने तर पॅडही काढले नव्हते. दोघे बाजूबाजूला बसून सामना पाहत असतानाच पंड्यांने विजयी चौकार लगावल्यानंतर दोघं एकदम आनंदाने उठून उभे राहिले. विराटने तर उठल्या उठल्या रोहितलाही हात देऊन उठवलं. विराट रोहितला मिठी मारणार इतक्यात रोहितच वाकून विराटला बिगला. दोघांनी केलेल्या या अनोख्या सेलिब्रेशनची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
नक्की पाहा >> Ind vs Aus: अक्षरने स्वत:च्याच गोलंदाजीवर पकडला ‘वेड’ लावणारा कॅच; तुफान फॉर्ममधील वेडच्या विकेटचा Video पाहाच
फिरकीपटू अमित मिश्रासहीत अनेकनांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तुम्हीच पाहा हा मजेदार आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना तितकाच आनंद देणारा व्हिडीओ…
१)
२)
३)
४)
५)
६)
विराटला टी-२० विश्वचषकाआधी फॉर्म गवसल्याने भारतीय संघाची जेतेपदासाठीची दावेदारी अधिक मजबूत झाल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. तर सलामीवीर म्हणून फलंदाजीला येणाऱ्या रोहितनेही या तिन्ही सामन्यांमध्ये सामाधानकार कामगिरी केली आहे. नागपूरमधील आठ षटकांचा सामना तर तर रोहितने एकहाती जिंकून दिला होता. त्यामुले आता ही जोडगोळी भारताला १५ वर्षानंतर टी-२० विश्वचषक जिंकून देणार का याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.