भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२३ जिंकली आहे. भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला २-१ने पराभूत करून सलग चौथ्यांदा ही मालिका जिंकली आहे. या कसोटी मालिकेतील शेवटचा म्हणजेच चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला, जो अनिर्णित राहिला. या सामन्यात विराट कोहलीने १८६ धावा केल्या आणि शुबमन गिलने १२८ धावांची शानदार शतकी खेळी केली. ही मालिका जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले की, “ही मालिका भारतीय संघासाठी खूप कठीण होती, परंतु आमच्या संघाने दडपणाखाली चांगली कामगिरी केली.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल द्रविड स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, “ कोच असल्यावर फार काही करता येत नाही, त्याचा रोल फक्त सामन्याआधी आणि सामन्यानंतर असतो. शेवटी जे काही करायचे असते ते त्या खेळाडूला करायचे असते. त्यामुळे संघासाठी धड फलंदाजी ना गोलंदाजी ना साधं क्षेत्ररक्षण यापैकी काहीही करता येत नाही. कोच असल्यावर वहीत नोंदी ठेवणे एवढेच हातात असते.” असे म्हणत त्याने संजय बांगरच्या प्रश्नाला उत्तर दिले.

हेही वाचा: IND vs AUS: ‘जीव धडधडला, घाम फुटला…’, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ड्रेसिंग रूममध्ये का होते चिंतेत? जाणून घ्या

सामन्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड काय म्हणाले

सामना संपल्यानंतर राहुल द्रविडने एका मुलाखतीत सांगितले की, “ही एक कठीण मालिका होती. या मालिकेत असे अनेक प्रसंग आले जेव्हा आम्ही खूप दडपणाखाली होतो, परंतु आम्ही त्यांना चांगला प्रतिसाद देऊ शकलो. मालिकेची सुरुवात एका बरोबरीने केली. कसोटीतील शतक, विराटने येथे मोठे शतक पूर्ण केले. दरम्यान, आमच्याकडे जडेजा, अक्षर आणि शुबमन होते, ज्यांनी चांगली कामगिरी केली. कदाचित या यादीत काही नावे चुकली असतील.”

राहुल द्रविड पुढे म्हणाला, “आम्हाला काही खेळाडू हवे होते जे दडपणाखाली प्रतिसाद देऊ शकतील आणि आम्हाला ते सापडले. त्यांच्याशी स्पर्धा करणे आणि त्यांच्यात चांगले यश मिळवणे ही अभिमानास्पद कामगिरी आहे. शुबमनसाठी ४-५ हे काही महिने रोमांचक होते. हे छान आहे. एक तरुण खेळाडू पुढे येताना आणि परिपक्व होताना पाहणे. हे आमच्यासाठी एक चांगले चिन्ह आहे आणि हे दीर्घकाळ चालू शकते. तो एक सुंदर मुलगा आहे आणि त्याच्या कौशल्यांवर खूप मेहनत घेतो. विराटसारख्या खेळाडूंकडून शिकण्याची ही एक चांगली संधी होती, रोहित आणि अगदी स्टीव्ह स्मिथ. याशिवाय द्रविडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, “आमची नजर न्यूझीलंड-श्रीलंका मॅचवर होती.” तो सामना संपल्यावर आमचं लंच. चालू होते, सामन्यात न्यूझीलंड विजयी होताच आम्ही खूप खुश झालो.”

हेही वाचा: IND vs AUS: “मी आता काय करू, नोकरी सोडून देऊ?” सामन्यानंतर पुजाराच्या गोलंदाजीवर अ‍ॅश अण्णाचे मजेशीर ट्वीट

जडेजाने सांगितले की, मला अश्विनसोबत क्रिकेटबद्दल बोलायला आवडते. तो म्हणाला, “आम्ही नेहमी खेळपट्टी आणि क्षेत्ररक्षण यावर बोलतो. त्याला क्रिकेटबद्दल भरपूर माहिती आहे आणि तो कुठेही क्रिकेटबद्दल गप्पा मारू शकतो. मात्र, त्याच्या फलंदाजीबाबत तो स्वतः खुश नाही आहे. फलंदाजीत चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयश आल्याबद्दल त्याने निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, “या मालिकेतील माझ्या फलंदाजीवर मी नाराज आहे. मी अनेकदा चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करण्यात अपयशी ठरलो आहे, विशेषत: या सामन्यात. आशा आहे की पुढच्या मालिकेत मी माझी फलंदाजी सुधारून चांगली कामगिरी करू शकेन.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind v aus 4th test being a coach you can only write in the book cant play in ground hence rahul dravid praised players after match avw